Infosys: ‘इन्फोसिस’च्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांहून अधिक घसरण; गुंतवणूकदारांचे 48,000 कोटींचे नुकसान
सोमवारी इन्फोसिस लिमिटेडच्या (Infosys) शेअर्समध्ये 9 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक तज्ञांनी मार्च तिमाहीसाठी त्यांच्या मार्जिन अंदाजात कपात केल्याने, शेअर्सचे भाव अचानक पडल्याचे बोलेले जात आहे.
सोमवारी इन्फोसिस लिमिटेडच्या (Infosys) शेअर्समध्ये 9 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे (investors) सुमारे 48 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक तज्ञांनी मार्च तिमाहीसाठी त्यांच्या मार्जिन अंदाजात कपात केली असून, मार्च अखेरीस, कंपनीने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केल्यामुळे हे शेअर्स खाली आले आहेत. 23 मार्च 2020 नंतर बाजारात इन्फोसिसच्या शेअरमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. सोमवारी शेअरने प्रति शेअर 1,592 रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. बीएसईवर सकाळी 9.30 वाजता इन्फोसिसचा शेअर 1,642 रुपये प्रति शेअरवर सुरू होता. जेफरीज इंडियाने आपल्या मार्जिन गणनेत 100 ते 170 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये 21.9 टक्के मार्जिन अपेक्षित आहे.
ब्रोकरेज कंपन्यांचे मत
ब्रोकरेज कंपनी नोमुरा रिसर्चला FY2023 मध्ये EBIT मार्जिन वार्षिक आधारावर 22 टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा असली तरी, आर्थिक वर्ष 2022-24 मध्ये, प्रति शेअर कमाई पाच ते सात टक्क्यांनी घसरली आहे. कमी फरकाची अपेक्षा केल्याने ही घसरण पहायला मिळत असल्याचे बोलेले जात आहे. B&K सिक्युरिटीजने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 22.7/23.7 टक्के मार्जिनचा अंदाज लावला आहे. आणि त्यामुळे त्याचा EPS दरवर्षी 5 टक्क्यांनी कमी करून 63/78 रुपये प्रति शेअर केला आहे. त्रैमासिक आधारावर इन्फोसिसच्या महसुलात 1.2 टक्के वाढ झाली आहे.
रशियातील प्रोजेक्ट गुंडाळले
दरम्यान, रशिया-युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने रशियामधून आपले कामकाज बंद करण्यास सुरुवात केली आहे. निकालानंतर कंपनीने माहिती दिली होती की, ती रशियातील कोणत्याही क्लायंटसोबत काम करणार नाही. आज बंगलोरमध्ये, इन्फोसिसच्या सीईओने माहिती दिली की कंपनीने रशियामधून प्रोजेक्ट संपविण्यास सुरुवात केली आहे आणि ते रशियाच्या बाहेर इतर देशांमध्ये प्रोजेक्ट हलवत आहेत. इन्फोसिसचे हे पाऊल भारत सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळे असल्याचे बोलेले जात आहे.
हेही वाचा:
पत्नीकडून 10 हजार उसने घेत सुरु केली कंपनी, आज झाला वटवृक्ष
PPF Account: पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याची करु नका घाई; अशी संधी पुन्हा नाही