अल्पबचत योजनेतील गुंतवणुकीवरचा फायदा कायम, NSC, PPF, KVP, Sukanya योजनेवरील व्याजदर जैसे थेच
एप्रिल-जून 2022 या तिमाहीत अल्पबचत योजनांमध्ये केलेल्या नव्या गुंतवणुकीवर मागील तिमाहीप्रमाणेच व्याजदर मिळतील. त्यामुळे जर तुम्ही अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणुक करत असाल तर गेल्या महिन्याप्रमाणेच व्याजदर मिळेल.
अल्पबचत योजनांच्या (Small Saving Scheme) व्याजदरात सरकारने कोणताही बदल केलेला नाही. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी या योजनांचा व्याजदर पुढील तिमाहीसाठी कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच गेल्या महिन्यात जो व्याजदर तुमच्या योजनांसाठी लागू होता. तेच व्याज मिळेल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP) आणि सुकन्या समृद्धी योजना या सर्वसाधारण गुंतवणुकदारांसाठी सुरु असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच चालू तिमाहीत या योजनांना मागील तिमाहीत जेवढे व्याज दिले जात होते, तेवढेच व्याज मिळेल. बँकांचे व्याजदर कमी अधिक होतात. मात्र पोस्ट खात्यावर (Post Office) त्याचा परिणाम होत नाही. पोस्ट खात्यातील योजनांमध्ये अधिकचा परतावा मिळत असल्याने अनेक गुंतवणुकदारांचा या योजनांमध्ये गुंतवणुकीचा कल असतो. या योजनांवर गेल्या महिन्यात ज्या दराने व्याज मिळत होते. तोच व्याजदर 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 या कालावधीसाठी लागू राहील.
असा आहे व्याजदर
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर ( PPF) 7.10 टक्के व्याज मिळत आहे, ते कायम राहिल. याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असून तुम्ही या योजनेत वार्षिक 500 ते 1.5 रुपये जमा करू शकता. खाते पक्व झाल्यानंतर ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवता येते.
लोकप्रिय असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर (SSY) 7.6 टक्के व्याज मिळत होते. तेही कायम आहे. एका कुटुंबातील दोन मुलींसाठी ही योजना घेता येऊ शकते. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लाडक्या मुलींसाठी तुम्ही हे खाते उघडू शकता. तुम्ही वार्षिक 250 ते दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेवर 6.8 टक्के व्याजदर लागू होता. येत्या तिमाहीत हाच व्याजदर कायम आहे. ही योजना 5 वर्षांसाठी असते. चक्रवाढ व्याजाच्या रुपाने व्याज देण्यात येते. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परतावा देण्यात येतो. . गुंतवणूकदार कमीतकमी 10 रुपयांसह खाते उघडू शकतात आणि 100 रुपयांच्या पटीत रक्कम वाढवू शकतात. कमाल रक्कम किती ठेवावी याला मर्यादा नाही.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) सारख्या योजनांमध्ये 7.4 टक्के व्याजदर मिळत होते, ते पुढे ही कामय आहे.60 वर्षांवरील लोक गुंतवणूक करू शकतात. किमान एक हजार रुपये किंवा त्याच्या पटीत आणि जास्तीत जास्त वार्षिक दीड लाख रुपये खात्यात जमा होऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात आली आहे.
किसान विकास पत्रावर 5.9 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत दामदुपट्टीची हमी मिळते. अर्थमंत्रालय या योजनेवर निश्चित व्याजदर देते. त्यावर तुम्हाला परतावा मिळतो. सध्याच्या दराने तुमची गुंतवणूक 124 महिन्यांत (10 वर्षे आणि 4 महिने) दुप्पट होईल. किमान 10 रुपयांपासून योजनेत गुंतवणूक करता येते आणि 100 रुपयांच्या पटीत ही गुंतवणूक करता येते.
पोस्ट खात्याच्या मुदत ठेव योजनेत जमा गुंतवणुकीवर 5.5 ते 6.7 टक्के व्याज मिळेल. व्याजाचे पैसे दर तिमाहीला जोडले जातात. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये 1,2,3 अथवा 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिट उघडता येते. यामध्ये किमान गुंतवणुकीची मर्यादा 10 रुपये आहे तर अधिकतम गुंतवणूक 100 रुपयांच्या पटीत जमा करता येते.
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव (RD) या योजनेवर 5.8 टक्के व्याज मिळते आणि चक्रवाढ दराने व्याज वाढते. आपण दरमहा जास्तीतजास्त 100 रुपयांच्या पटीत तर किमान 10 रुपयांनी या योजनेत गुंतवणुकीची सुरुवात करु शकता.
हेही वाचा:
मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?
एसबीआय की टपाल कार्यालय ; मुदत ठेवीवर कुठे मिळेल कमाईवर अधिकचा परतावा