एप्रिल 2025 सॉवरेन गोल्ड बाँड प्रीमॅच्युअर रिडेम्प्शन डेट जाणून घ्या
सॉवरेन गोल्ड बाँड हे एक गुंतवणूक साधन आहे ज्याचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षांचा आहे, ज्याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार पाच वर्षांनंतर ठराविक तारखेला त्यांचे रोखे त्यांच्या देय तारखेपूर्वी परत मिळवू शकतात.

तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली की, मुदतपूर्व रिडेम्प्शनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली आहे. जर आपण मुदतीत अर्ज केला नाही तर आपल्याला पुढील रिडेम्प्शन सायकलची प्रतीक्षा करावी लागू शकते.
लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा
सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) हे एक गुंतवणूक साधन आहे ज्याचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे, ज्याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार पाच वर्षांनंतर ठराविक तारखेला त्यांचे रोखे त्यांच्या देय तारखेपूर्वी परत मिळवू शकतात.
तुम्हीही सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करत असाल आणि पाच वर्षांनंतर ते रिडीम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अर्जाच्या तारखा काळजीपूर्वक माहित असायला हव्यात.
एप्रिल 2025 मध्ये तीन प्रमुख SGB हप्त्यांचे मुदतपूर्व रिडेम्प्शन होणार आहे. यामध्ये SG 2017-18 Series III, SG 2017-18 Series IV आणि SG 2017-18 Series V चा समावेश आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या तारखेबद्दल.
SG 2017-18 Series III साठी रिडेम्प्शन तारीख 16 एप्रिल 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2025 आहे. गुंतवणूकदार रिटेल डायरेक्ट, NSDL/CDSL/RBI रिटेल डायरेक्टच्या माध्यमातून रिडेम्प्शनसाठी अर्ज करू शकतात. SG 2017-18 Series IV रिडेम्प्शन तारीख 23 एप्रिल 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे. या तारखेपूर्वी गुंतवणूकदारांना मुदतपूर्व मोचनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तर SG 2017-18 Series V ची रिडेम्प्शन डेट 30 एप्रिल 2025 आहे आणि त्यासाठी 21 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करता येईल. याशिवाय, SG 2017-18 Series VI चे मुदतपूर्व रिडेम्प्शन 6 मे 2025 रोजी होणार आहे, ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
एक लक्ष्यात घ्या की, तुम्ही मुदतीत अर्ज केला नाही तर आपल्याला पुढील रिडेम्प्शन सायकलची प्रतीक्षा करावी लागू शकते.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)