Tata Group | टाटा समुहाच्या सर्वच कंपन्या एकत्र, गुंतणूकदारांचा फायदा तर समजून घ्या..
Tata Group | टाटा समुहाची महत्वकांक्षी योजनेमुळे गुंतवणूकदार मालामाल होणार आहे. त्यांचा काय फायदा होणार आहे ते समजून घेऊयात..
नवी दिल्ली : देशातील प्रमुख स्टील उत्पादक कंपनी टाटा स्टील (Tata Steel) मध्ये इतर सात कंपन्यांचं विलीनीकरण करण्यात येणार आहे. या विलीनीकरण प्रस्तावाला (Merger plan) टाटा स्टीलच्या संचालक मंडळानेही मान्यता दिली आहे. पण यातून गुंतवणूकदारांना काय फायदा होईल? तेही पाहुयात..
या विलीनीकरण योजनेत, सहायक कंपनी, टाटा स्टील लॉंग प्रोडक्ट्स लिमिटेड, द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, टाटा मेटालिक्स लिमिटेड, द इंडियन स्टील अँड वायर प्रोडक्ट्स लिमिटेड, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड, टीआरएफ लिमिटेड आणि एस अँड टी मायनिंग कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.
टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्स लिमिटेडमध्ये टाटा स्टीलची एकूण 74.91 टक्के हिस्सेदारी आहे. तर टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 74.96 टक्के, टाटा मेटालिक्स लिमिटेडमध्ये 60.03 टक्के आणि द इंडियन स्टील अँड वायर प्रोडक्ट्स लिमिटेडमध्ये 95.01 टक्के वाटा आहे.
तर टाटा स्टील मायनिंग लिमिटेड आणि एस अँड टी मायनिंग कंपनी लिमिटेड या दोन्ही टाटा स्टीलच्या अख्त्यारीतील सहायक कंपन्या आहेत. खर्च कपातीसाठी आणि क्षमता वृद्धीसाठी टाटा समुहाने या सर्व कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचे ठऱवले आहे. वितरण आणि विपणन नेटवर्क मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या विलीनीकरणामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होणार आहे. शेअरधारकांना या विलीनीकरणाचा फायदा होईल. शेअरधारकांना शेअर वाढून मिळतील. त्यामुळे आपोआप शेअरधारकांना शेअरचे गिफ्ट मिळणार आहे.
या योजनेनुसार, गुंतवणूकदारांना टाटा स्टीलचे शेअर मिळतील. TRFच्या 10 शेअरच्या बदल्यात 17 शेअर मिळतील. तर TCPL च्या 10 शेअरच्या बदल्यात 67 शेअर मिळतील. टिनप्लेटच्या 10 शेअरच्या बदल्यात टाटा स्टीलचे 33 शेअर मिळतील. टाटा मेटालिक्सच्या 10 शेअरच्या बदल्यात 79 शेअर मिळतील.