Share | अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूक दुप्पट..हा शेअर ठरला रॉकेटसिंग..
Share | या शेअर ब्रँडप्रमाणेच चमकला. त्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले. अवघ्या सहाच महिन्यांत या शेअरने गुंतवणूक दुप्पट केली.
नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) सध्या घमासाण सुरु आहे. बाजारात दे दणादण सुरु आहे. जुलैपर्यंत रिव्हर्स गेलेल्या बाजाराने अनेकाची माया लुटली. त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) हवलादिल झाले आहेत. पण काही धुमकेतू आणि शुक्र तारे गुंतवणूकदारांना दिलासा देत आहेत.
Tata Investment Corporation च्या शेअरने यंदा कमाल केली. केवळ सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला. टाटा समुहाच्या या शेअरमध्ये 98 टक्क्यांची तेजी दिसून आली.
टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन एक गैर बँकिक वित्तीय संस्था (NBFC) आहे. ही कंपनी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करते. या कंपनीला या आर्थिक वर्षात प्रचंड फायदा झाला आहे. तसेच कंपनीचा व्यापारही वाढला आहे. त्यामुळे कंपनीने शेअर बाजारात छाप सोडली आहे.
टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशनचे शेअर सातत्याने तेजीत आहे. गेल्या 5 दिवसात शेअरमध्ये 46 टक्के, एका महिन्यात 82 टक्के तर सहा महिन्यांत 98 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. हा शेअर आणखी वृद्धी नोंदवण्याची शक्यता आहे.
या कंपनीने सूचीबद्ध, सूचीत नसणाऱ्या, इक्विटी शेअर, डेट इंस्ट्रमेंट, टाटा कंपनीच्या इतर म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केली आहे. या कंपनीची मुख्य कमाई ही डिव्हिडंट, व्याज आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून होते.
या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत 74.19 कोटी रुपयांचा डिव्हिडेंटमधून कमाई झाली आहे. तर कर कपात करुन कंपनीने 89.74 कोटी रुपये कमाई केली आहे. गेल्या वर्षी कंपनीला 53.89 कोटी रुपये नफा कमावला होता.
टाटा इनवेस्टमेंट कॉरपोरेशन को मौजूदा वित्त वर्ष की पहली तिमाही में 74.19 करोड़ रुपये की डिविडेंड इनकम हुई थी जबकि टैक्स काटकर 89.74 करोड़ रुपये का मुनाफा हुआ था. वही पिछले वित्त वर्ष की पहली तिमाही में डिविडेंड इनकम 41.26 करोड़ रुपये और टैक्स के बाद 53.89 करोड़ रुपये का मुनाफा हुआ था.
या कंपनीचा मार्केट कॅप 13,984 कोटी रुपये आहे. ही कंपनी भविष्यात बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. कंपनीने सध्या बँकिंग सेक्टरमध्ये 12.32 टक्क्यांची गुंतवणूक केली आहे.