EPFO PF Withdrawal : वारंवार काढताय पीएफची रक्कम? मग ही बातमी वाचाच..
EPFO PF Withdrawal : जर तुम्ही पीएफ खात्यातून रक्कम काढणार असाल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात पीएफ खातेदारांना मोठा दिलासा आहे. 1 एप्रिल 2023 रोजीपासून मोठा बदल होत आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही पण पीएफ खात्यातून (PF Account) वारंवार पैसे काढत असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठीच आहे. केंद्रिय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रोव्हिडेंट फंडांसंबंधीच्या नियमांत बदल केला आहे. या नवीन नियमानुसार, भारतीय भविष्य निर्वाह निधीत (EPFO) नोंदणी करणाऱ्या सदस्यांना त्याचा फायदा होईल. सदस्यांना पाच वर्षे पूर्ण झाले नाही आणि त्याला त्याच्या खात्यातून रक्कम काढायची असेल तर त्याला कर द्यावा लागेल. पण जर त्याने पाच वर्षानंतर पीएफ खात्यातून रक्कम काढली तर त्याच्या खात्यातून टीडीएस (TDS) कपात होणार नाही. तर वर्षाला 2.50 लाख रुपयांहून अधिक पीएफ योगदान जमा होत असेल तर त्यावर कर द्यावा लागणार नाही.
केंद्रीय अर्थसंकल्पात टीडीएसबाबत मोठा बदल झाला आहे. जर तुम्ही पीएफ अकाऊंटमधून रक्कम काढणार असाल तर आता 30% ऐवजी 20% टीडीएस भरावा लागेल. 1 एप्रिल 2023 रोजीपासून हा नियम लागू होत आहे. पण जर EPF मधून पैसे काढायचे असतील तर या त्यावर टीडीएस कपात होईलच.
जर तुम्ही 5 वर्षांनी EPFO मधून रक्कम काढत असाल तर त्यावर तुम्हाला कुठलाही टीडीएस द्यायची गरज नाही. पण जर या नियमाप्रमाणे तुम्ही पाच वर्षांपूर्वीच रक्कम काढणार असाल तर मात्र टीडीएस कपात होईल. त्यावर कर द्यावा लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी टीडीएससाठीची 10 हजार रुपयांची मर्यादाही हटविली आहे.
मनी9 च्या अहवालानुसार, जर तुम्ही आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर पीएफ वा ईपीएफमधून रक्कम काढताना अडचण येईल. तुम्ही पाच वर्षांपूर्वीच या खात्यातून रक्कम काढणार असाल तर तुम्हाला पीएफ विथड्रावलवर कर द्यावा लागेल. पण पाच वर्षांच्या नियमाची पूर्तता केल्यास तुम्हाला कोणताही कर द्यावा लागणार नाही.
जर पीएफ खाते, खातेदाराच्या पॅनकार्डशी जोडलेले असेल तर रक्कम काढताना कोणताही टीडीएस द्यावा लागणार नाही. जी रक्कम पीएफमधून काढण्यात आली ती वार्षिक नियोजनात गृहित धरण्यात येईल. पीएफ खातेदाराला त्यावर इनकम टॅक्स स्लॅबनुसार कर द्यावा लागेल.
तज्ज्ञांच्या मते, खातेदारांचे पॅन कार्ड पीएफ खात्याशी जोडलेले नसेल तर त्याच्या एकूण रक्कमेवर टीडीएस कापण्यात येतो. सध्या टीडीएस 30 टक्के आहे. त्यात घट होईल. 1 एप्रिल 2023 रोजी टीडीएस 20 टक्के कपात होईल. पीएफ रक्कम काढण्यासाठी हा नवीन नियम मार्चनंतर लागू होईल.