Aadhaar Card Update : फ्रीमध्ये करा आधार कार्ड अपडेट, UIDAI ने वाढवली तारीख

Aadhaar Card Update : फ्रीमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपडेट करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीसाठी या सुविधेचा कालावधी वाढवला आहे. आता या तारखेपर्यंत नागरिकांना मोफत आधार कार्ड अद्ययावत करता येईल.

Aadhaar Card Update : फ्रीमध्ये करा आधार कार्ड अपडेट, UIDAI ने वाढवली तारीख
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 4:09 PM

नवी दिल्ली : आधार कार्डधारकांसाठी गुडन्यूज आहे. 10 वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांना आता आणखी तीन महिने त्यांचे आधार (Aadhaar Card Update) मोफत अपडेट करता येणार आहे. यापूर्वी 14 जून पर्यंत आधार अपडेट करण्याची मुदत होती. यावर्षी मार्च महिन्यापासून ही सवलत देण्यात आली होती. पण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुदत वाढ दिली आहे. आता नागरिकांना 14 सप्टेंबर, 2023 रोजी पर्यंत आधार कार्ड अपडेट करता येईल. आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झाले असेल तर नागरिकांनी आधारमधील पत्ता आणि डेमोग्राफिक (Demographic) तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. ही पद्धत अत्यंत सोपी आहे.

महत्वाच्या कामासाठी उपयोग सध्या आधार हा अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्डची गरज पडते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार अपडेट मोफत करता येते.

myAadhaar पोर्टलवर अपडेट आधार कार्ड अपडेट myAadhaar पोर्टलवर करता येते. ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डमधील माहिती अद्ययावत करता येईल. या 15 मार्च ते 14 जून 2023 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. 14 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

कितीवेळा कराल अपडेट आधार कार्डमधील माहिती अपडेट किती वेळा करता येते, असा सर्वांनाच प्रश्न पडतो. त्यासंबंधी काही नियम आहेत. त्यानुसार, नागरिकांच्या नावात दोनदा बदल करता येतो. तर जन्मतारीख आणि लिंगामध्ये एकदाच बदल करता येतो. आधार कार्ड तयार करताना आणि माहिती भरताना काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.

असे करा आधार कार्ड अपडेट

  •  https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा
  • अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा
  • 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा
  • ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा
  • आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल
  • ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा
  • ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा

कॉपी करा स्कॅन

  • आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल करता येतो
  • ओळखपत्र स्कॅन करुन नावात बदल करता येईल
  • जन्मदाखला स्कॅन करुन जन्मतारीख अद्ययावत करा
  • लिंग बदल करण्यासाठी तुमचे ओळखपत्र पुरेसे आहे
  • ऑनलाइन SSUP पोर्टल, मोबाईल ॲपच्या सहायाने भाषा बदलता येते
  • सध्या SSUP पोर्टलवर एकूण 13 भाषा आहेत

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.