Aadhaar Card वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 14 मार्चपर्यंत करता येईल हे काम
Aadhaar Card Update | आधार कार्डविषयी एक अपडेट समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड हे आजही भारतीयांसाठी महत्वाचा दस्तावेज आहे. अनेक ठिकाणी या कार्डचा उपयोग होतो. या संबंधीचे काम नागरिकांना 14 मार्चपर्यंत करता येईल.
नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : आधार कार्डविषयी केंद्र सरकारने पुन्हा मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी, हे कार्ड अपडेट करण्यासाठी निशुल्क सेवा सुरु केली होती. आधार कार्ड हे आजही भारतीयांसाठी महत्वाचा दस्तावेज आहे. अनेक ठिकाणी या कार्डचा उपयोग होतो. आधार कार्डमध्ये मोफत बदल करण्याचा कालावधी पुन्हा वाढविण्यात आला आहे. आता नागरिकांना 14 मार्च 2024 रोजीपर्यंत आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला.
आधार अपडेटला मोठा प्रतिसाद
सर्वसामान्य नागरिकांनी आधार कार्डमधील मोफत बदल करण्याच्या योजनेला मोठा प्रतिसाद दिला. त्याआधारे ही सुविधा गेल्यावेळी 3 महिन्यांसाठी वाढवली होती. 15 डिसेंबरपर्यंत ही मुदत होती. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. आता नागरिकांना 14 मार्च 2024 रोजीपर्यंत आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला.
याठिकाणी करा मोफत बदल
या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांआधारे myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या माध्यमातून 14 मार्चपर्यंत मोफत बदल करण्यात येणार आहे. आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे. पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी 25 रुपये शुल्क अदा करावे लागेल.
10 वर्षें उलटल्यास करा बदल
आधार कार्ड अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार कार्डमध्ये अपडेट मोफत करता येते.
असे करा आधार कार्ड अपडेट
- UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा
- अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा
- 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा
- ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा
- आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल
- ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा
- ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा