Income Tax : आयकर विभाग ही युझर्स फ्रेंडली! मोबाईलवर उघडा वेबसाईट

Income Tax : आयकर विभागाकडून नवीन अपडेट समोर आले आहे. त्यानुसार, करदात्यांना आता चालता फिरता मोबाईलवर आयकर विषयीची माहिती सहज मिळेल. खात्याने मोबाईल फ्रेंडली वेबसाईट सुरु केली आहे. त्यात अनेक फीचर्स जोडले आहेत. त्याचा करदात्यांना फायदा होईल.

Income Tax : आयकर विभाग ही युझर्स फ्रेंडली! मोबाईलवर उघडा वेबसाईट
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 9:18 AM

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : आयकर खाते (Income Tax Department) झपाट्याने कात टाकत आहे. गेल्या दोन वर्षांत युद्धपातळीवर अनेक प्रयोग सुरु आहेत. करदात्यांसाठी अनेक नवीन बदल होत आहे. नवीन संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. त्याआधारे सहज कराचा भरणा करता येतो. कर रचनेत आणि कर प्रणालीत बदल करण्यात आले आहे. आधुनिक तांत्रिक आयुधांचा वापर करत करदात्यांसाठी अनेक सोयी-सुविधा देण्यात येत आहे. एकूणच कर प्रणालीत पारदर्शकता आणणे, ती जलद करण्यावर केंद्र सरकारचा भर दिसून येत आहे. आता त्यात आयकर विभागाकडून नवीन अपडेट समोर आले आहे. खात्याने मोबाईल फ्रेंडली वेबसाईट (Mobile Friendly Website ) सुरु केली आहे. त्यात अनेक फीचर्स जोडले आहेत. त्याचा करदात्यांना फायदा होईल.

वेबसाईटमध्ये मोठा बदल

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 26 ऑगस्ट, 2023 रोजी संकेतस्थळाचे नुतनीकरण केले. त्यात अनेक फीचर्स जोडले आणि आयकर खात्याची नवीन वेबसाईट नव्या दमाने सुरु केली. incometaxindia.gov.in असे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर वापरकर्त्यांना अनुकूल इंटरफेस आणि अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. ही मोबाईल रिस्पान्सिव्ह वेबसाईट आहे. त्यादृष्टीने तिची रचना करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

मोबाईल फ्रेंडली वेबसाईट

हे संकेतस्थळ सहजपणे मोबाईलवर उघडता येईल. तुमचे काम पूर्ण करता येईल. CBDT ने नवीन संकेतस्थळावर नवीन फीचर्स आणि सुविधासह कंटेटसाठी मेगा मेनूची पण सुरुवात केली आहे. सीबीडीटीने यामध्ये वापरकर्त्यांसाटी नवीन कायदे, नियम, कर रचना यांची माहिती दिली आहे. ही माहिती करदात्यांना त्यांच्या ई-मेलवर मागवता येईल. त्याची प्रिंट आऊट पण काढता येईल.

अनेक अपडेट आले समोर

आयकर खात्याच्या संकेतस्थळाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यात कायदेविषयक माहिती आता थेट प्रिंट करता येईल अथवा ई-मेलद्वारे जतन करता येईल. ड्यु डेट फीचर पण यामध्ये आहे. त्यामध्ये विविध विषयाशी अंतिम मर्यादेची माहिती देण्यात आली आहे. हे पोर्टल कसे वापरायचे याची माहिती पण देण्यात आली आहे.

हे पण बदल

बॅकएंड सर्व्हर जोडल्याने वेबसाईट आता जलद उघडते. तिचा वापर आणि हातळणे पण सोपे झाले आहे. या संकेतस्थळावर हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देण्यात आली आहे. पॅनशी संबंधित प्रश्न, रिटर्न, ई-फायलिंग, रिफंड याविषयीची माहिती, तक्रारीचा पर्याय पण देण्यात आला आहे. या संकेतस्थळावर गेल्यावर करदात्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.