Aadhaar Update Free : आधार कार्ड मोफत करा अपडेट, उरला आता एकच दिवस, नंतर लागेल इतकी फी

Aadhaar Update Free : आधार कार्ड मोफत अपरडेट करण्यासाठी आता एकच दिवस उरला आहे. नंतर तुम्हाला इतके शुल्क द्यावे लागेल.

Aadhaar Update Free : आधार कार्ड मोफत करा अपडेट, उरला आता एकच दिवस, नंतर लागेल इतकी फी
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 4:26 PM

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी उद्यापर्यंतचा वेळ दिला आहे. फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जूनपर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतर आधारमध्ये तपशील भरण्यासाठी, आवश्यक बदलासाठी नागरिकांना पूर्वीसारखेच शुल्क अदा करावे लागेल. ज्यांच्या आधार कार्डला 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि त्यांनी यादरम्यान कधीच आधार कार्ड अपडेट केले नाही, त्यांच्यासाठी आधार कार्ड मोफत अद्ययावत करण्याची एकच दिवसांची संधी उरली आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तर आधार केंद्रावर (Aadhaar Centre) जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

या कालावधीत मोफत सेवा आधार प्राधिकरणाने नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत सेवा दिली होती. दस्तावेज ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्यासाठी ही सुविधा मोफत सुरु करण्यात आली होती. 15 मार्च ते 14 जून 2023 रोजीपर्यंत ही सेवा मोफत होती. उद्या, 14 जून रोजी मोफत सेवा समाप्त होत आहे. त्यामुळे तुम्ही अजून आधार कार्ड अपडेट केले नसेल तर अद्ययावत करुन घ्या.

इतके शुल्क द्यावे लागेल आधार प्राधिकरणाने ऑनलाईन कागदपत्रे अपडेट करण्यासाठी मोफत सेवा 14 जून 2023 पर्यंत देण्यात आली होती. या मुदतीनंतर आधार केंद्र अथवा ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

ही घ्या काळजी

  1. आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल करता येतो
  2. नावात बदल करण्यासाठी ओळखपत्राची स्कॅन कॉपी लागेल
  3. जन्मतारीख अपडेट करण्यासाठी जन्मप्रमाणपत्राची स्कॅन कॉपीची आवश्यकता
  4. लिंग बदल करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागत नाहीत
  5. ऑनलाइन SSUP पोर्टल, मोबाईल ॲपच्या सहायाने भाषा बदलता येते
  6. सध्या या पोर्टलवर एकूण 13 भाषा आहेत

आधारचा पत्ता असा करा मोफत अपडेट

  1. सर्वात अगोदर https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जा
  2. लॉगिन करा. नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करण्यासाठी पर्याय निवडा
  3. आता अपडेट आधार ऑनलाईन वर क्लिक करा
  4. डेमोग्राफिक पर्यांया आधारे या सूचीतील तुमचा पत्ता निवडा
  5. आधार अपडेटसाठीच्या प्रक्रियेवर क्लिक करा
  6. स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि आवश्यक डेमोग्राफिक माहिती भरा
  7. आता एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) जनरेट होईल. पुढील ट्रॅकिंगसाठी हा नंबर महत्वाचा असेल
  8. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या संबंधीचा एक एसएमएस तुम्हाला मिळेल

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.