LIC Scheme : एकदम जबरदस्त स्कीम! दररोज करा एवढी बचत, मिळतील 50 लाखांहून अधिक

LIC Scheme : दीर्घकालीन गुंतवणुकीनंतर तुम्ही मोठा निधी जमा करु इच्छित असाल तर एलआयसीची ही पॉलिसी तुमच्या मदतीला धावून येईल. सरकारच्या मालकीची सर्वात मोठा विमा कंपनी एलआयसी तुम्हाला जीवन संरक्षण विम्यासह जोरदार परतावा पण देईल. शेअर बाजाराशी लिंक्ड नसल्याने ही योजना चांगली आहे.

LIC Scheme : एकदम जबरदस्त स्कीम! दररोज करा एवढी बचत, मिळतील 50 लाखांहून अधिक
परतावा जोरदार
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 6:06 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) अनेक योजनांमध्ये लाखो नागरिकांनी आतापर्यंत गुंतवणूक केली आहे. एलआयसीचे प्लॅन एवढ्यासाठी पण खास आहेत, कारण या योजनांमध्ये प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी काही ना काही तरतूद आहेच. दीर्घकालीन गुंतवणुकीनंतर (Long Term) तुम्ही मोठा निधी जमा करु इच्छित असाल तर एलआयसीची ही पॉलिसी (LIC Scheme) तुमच्या मदतीला धावून येईल. सरकारच्या मालकीची सर्वात मोठा विमा कंपनी एलआयसी तुम्हाला जीवन संरक्षण विम्यासह जोरदार परतावा (Best Return) पण देईल. शेअर बाजाराशी लिंक्ड नसल्याने ही योजना चांगली आहे.

जीवन लाभ योजना (Jeevan Labh Scheme) असे या लोकप्रिय योजनेचे नाव आहे. ही नॉन-लिंक्ड पॉलिसी विमाधारकाला मॅच्युरिटीनंतर एकरक्कमी लाभ होतो. तुम्ही रोज 253 रुपये बचत करुन मॅच्युरिटीवेळी 54 लाख रुपये प्राप्त करु शकता. शेअर बाजारावर अवलंबून नसल्याने एलआयसीची ही योजना सुरक्षित मानण्यात येते. विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसदाराला नुकसान भरपाईची रक्कम मिळते. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर ही योजना तुमच्यासाठी एकदम फिट आणि हिट ठरु शकते. पुढील 25 वर्षांत रोज केवळ 253 रुपये वाचवून तुम्ही 54 लाख रुपयांचा निधी जमवू शकता. तसेच विम्याचा लाभ ही मिळवू शकता.

तुम्ही दररोज 253 रुपयांची बचत केली तर महिना अखेरीस तुम्ही 7,700 रुपये वाचवाल. तर वर्षाला तुम्ही जवळपास 92,400 रुपयांचा प्रीमियम भराल. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीत जवळपास एकूण 20 लाख रुपये गुंतवणूक कराल. त्यावर तुम्हाला जोरदार परतावा मिळेल. तुम्हाला या गुंतवणुकीतून थोडा थोडा का नव्हे तर 54 लाखांचा परतावा मिळेल. या सोबतच तुम्हाला जीवन विम्याचे संरक्षण ही मिळले.

हे सुद्धा वाचा

अनेकजण उत्साहात एलआयसीची पॉलिसी (Insurance Policy) सुरु करतात. पण ती सुरु ठेवणे त्यांना पुढे कठिण जाते. मग अशावेळी पॉलिसी बंद पडते. ही बंद पडलेली पॉलिसी तुम्हाला पुन्हा सुरु करता येते. त्यासाठी एलआयसीने (LIC) आता सुविधा दिली आहे. तुम्हाला बंद पॉलिसी सुरु करता येणार आहे. पण त्यासाठी एक निश्चित कालावधी ठरविण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून व्यपगत, बंद पडलेली पॉलिसी सुरु करण्यासाठी एलआयसीने एक ड्राईव्ह सुरु केला आहे. या मोहिमेतंर्गत 1 फेब्रुवारी ते 24 मार्च 2023 रोजी दरम्यान एलआयसीची बंद पॉलिसी सुरु करता येणार आहे. सर्व प्रकारच्या पॉलिसी रिन्युअल करता येतील. काही कारणास्तव पॉलिसी बऱ्याच दिवसांपासून बंद झाली असेल तर ती सुरु करता येईल. हप्ता न भरल्याने ही पॉलिसी बंद झाल्यास आता पुन्हा सुरु करता येणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.