Karnataka Mango : विधानसभा निवडणुकीत दिसला कर्नाटकी ‘राग’! पण चाखलेत का हे 7 आंबे खास
Karnataka Mango : विधानसभा निवडणुकीत निकालातून कर्नाटकी राग दिसून आला. पण कर्नाटकचे हे 7 खास आंबे तुम्ही चाखलेत का? कोणते आहेत हे आंबे, त्यांची नावे तुम्हाला माहिती आहेत का?
नवी दिल्ली : उन्हाळा आली की, आंब्यांवर (Mango) ताव मारल्याशिवाय मन भरत नाही. रसरशीत आंब्यांनी दुपारचं सुग्रास जेवण मिळण ही पर्वणीच असते. आजकाल गावरान आंब्यांची संख्या कमी झाल्याने बाजारातील आंब्यांवर ताव मारण्यात येतो. फळांचा राजा आंबा आपल्याकडे कोठून येतो माहिती आहे का? अनेकदा जो हापूस (Alphonso) आपल्या माथी मारण्यात येतो, तो कोकणातील नसून कर्नाटकातला असतो. आज विधानसभा निवडणुकीत निकालातून कर्नाटकी राग (Karnataka Election Result) दिसून आला. पण कर्नाटकचे हे 7 खास आंबे तुम्ही चाखलेत का? कोणते आहेत हे आंबे, त्यांची नावे तुम्हाला माहिती आहेत का?
कर्नाटकातील आंब्याच्या काही जाती अत्यंत प्रसिद्ध आहेत. हे आंबे रसाला चवदार आणि रसरशीत आहेत. हा आंबा जास्त रस गाळतो आणि चव पण एकदम चांगली आहे. आंब्यांच्या जातीनुसार, त्याचा रंग, चव आणि वास वेगवेगळा आहे. या आंब्यांसाठी त्यानुसारच दाम मोजावे लागतात. कोणते आहेत हे आंबे, ते पाहुयात..
हे आहेत कर्नाटकचे खास आंबे
- तोतापुरी- तोतापुरी हा खास आंबा आपल्या बाजारपेठेत पण मिळतो. हा दक्षिण भारतातील लोकप्रिय आंबा आहे. हा आंबा चविष्ट आहे. या आंब्याची किंमत सर्वसाधारणपणे 85-100 रुपये किलो आहे. हा आंबा तुमच्या बाजारपेठेत पण सहज उपलब्ध असेल. आता विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हा आंबा उपलब्ध आहे.
- बादामी- बादाम आणि बादामी अशा प्रकारातील हा आंबा आहे. बादाम आपल्याकडे सहज उपलब्ध आहे. तर कर्नाटकचा बादामी आंबा खास आहे. या आंब्याला तिथे कर्नाटकचा हापूस म्हणून गौरविण्यात आले आहे. या आंब्याची किंमत 250 ते 300 रुपये किलोपर्यंत आहे. हा आंबा तुम्ही मित्रांकडून मागवू शकता. विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन याची विक्री करण्यात येते.
- नीलम- ‘त्याच्याच सम हा’ असं याचं वर्णन करता येईल. हा रसाळ आणि स्वादिष्ट आंबा कर्नाटकात अत्यंत लोकप्रिय आहे. या आंब्याला जोरदार मागणी आहे. मँगो शेकसाठी हा आंबा एकदम योग्य मानण्यात येतो. रसाळी झोडण्यासाठी या आंब्याचा खास वापर होतो. एप्रिल ते जून या महिन्यात हा आंबा मिळतो. याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. हा आंबा 30 ते 40 रुपये किलो आहे.
- रसपुरी- आता नावातच सर्व काही आले, नाही का? रसपुरीला कर्नाटकात आंब्यांची राणी मानण्यात येते. म्हैसूर परिसरात हा आंबा जास्त लोकप्रिय आहे. रसाळ आणि खास चवीचा आंबा रसासाठी वापरतात.
- बैंगनपल्ली- या आंब्याला सफेदा असे दुसरे एक नाव आहे. खासकरुन हा आंबा आंबट गोड प्रकारातील आहे. खाण्यासाठी याचा जास्त वापर होतो. बाजारात याची किंमत 80 ते 100 रुपये किलो आहे.
- मलिका- उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यासारखाच दिसणारा आणि चवीला असणारा हा आंबा आहे. पण दशहरीपेक्षा याची किंमत तीन पट अधिक आहे. याला कर्नाटकसह संपूर्ण भारतात खास मागणी आहे.
- सिंधुरा- दक्षिण भारतात सिंधुरा हा आंबटगोड आंबा आहे. याची किंमत 300 रुपये किलो आहे. रसापेक्षा खाण्यासाठी याचा अधिक वापर होतो. या आंब्याला पण खास मागणी आहे. हा आंबा विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.