Income Tax Notice | हे 3 Transaction करताना रहा सावधान, येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस

Income Tax Notice | तुमच्या काही व्यवहारांवर आयकर खात्याची करडी नजर असते. तुम्ही जर काही चुका कळत-नकळत केल्या तर या नोटीसचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. याविषयीचे काही नियम आहेत, त्यांचा भंग झाल्यास आयकर खात्याची वक्रदृष्टी पडते.

Income Tax Notice | हे 3 Transaction करताना रहा सावधान, येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 10:22 AM

नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : प्राप्तिकर खाते व्यवहारांवर बारीक लक्ष ठेऊन असते. नागरिकांच्या एका मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार असल्यास त्याचा फटका बसू शकतो. अशा व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर असते. इनकम टॅक्स विभाग (Income Tax Department) अशा व्यवहारांबाबत जाब विचारते. संबंधित व्यक्तीला नोटीस (Tax Notice) बजावण्यात येते. म्युच्युअल फंड, बँक, ब्रोकर आणि इतर ठिकाणी व्यवहार करताना नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला फटका बसू शकतो. गुंतवणूक करताना करदात्यांना अधिक सजग असणे आवश्यक आहे. नाहीतर मग आयकर खात्याचा ससेमिरा मागे लागू शकतो आणि उत्तर देताना नाकीनऊ येऊ शकतात.

एफडी करताना काळजी घ्या

बँकेत गुंतवणूक करताना काळजी घ्या. चांगल्या परताव्यासाठी मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यात येते. पण 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची एफडी केल्यास प्राप्तिकर खात्याची नोटीस येऊ शकते. एका मुदत ठेव योजनेत अथवा सर्व एफडी मिळून गुंतवणुकीची मर्यादा तुम्हाला ओलांडता येत नाही. नाहीतर नोटीस मिळते.

हे सुद्धा वाचा

अचल संपत्तीबाबत नियम

अचल संपत्तीच्या खरेदी-विक्री करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 30 लाख अथवा त्यापेक्षा अधिकची उलाढाल झाल्यास तुमचा व्यवहार प्राप्तिकर खात्याच्या रडरावर येईल. पण याविषयीच्या नियमांचे पालन केल्यास आयकर खात्याची नोटीस मिळणार नाही.

बचत खात्यात किती रक्कम

बँकेच्या बचत खात्याचा नियम पण जाणून घ्या. खात्यात मोठी उलाढाल केल्यास, मोठी रक्कम गुंतवल्यास पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुमच्या बचत खात्यात 10 लाख अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करत असाल तर बँक त्याची माहिती आयकर खात्याला देते. त्यामुळे तुम्हाला या व्यवहाराचा तपशील मागितल्या जाऊ शकतो. आयकर खात्याची नोटीस येऊ शकते.

ही गुंतवणूक पण नको जास्त

शेअर,डिबेंचर आणि बाँडसाठी सुद्धा नियम आहेत. शेअर बाजार, म्युच्युअल फंड यातील गुंतवणूक 10 लाख रुपयांपेक्षा अधिक नको. एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. आयकर खात्याची नोटीस येऊ शकते.

क्रेडिट कार्डचा व्यवहार

क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करताना नियम जाणून घ्या. एक लाख अथवा त्यापेक्षा अधिकचे क्रेडिट कार्डचे बिल रोखीत भरणे अडचणीत आणणारे ठरते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याविषयी सूचीत केले आहे. एका आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचे दहा लाखांचे बिल अदा करणे पण नोटीसला आमंत्रण देण्यासारखेच आहे. असे पेमेंट करण्यापूर्वी बँकेसह आयकर खात्याला सूचीत करणे फायदेशीर ठरते.

Non Stop LIVE Update
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली.
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.