पर्सनल लोन हवंय ? या पाच बॅंकाचं व्याज सर्वात कमी, पाहा कोणत्या बॅंका ?
घराचे किंवा कारचे लोन काढताना व्याजदर कमी असतो. परंतू पर्सनल लोनसाठी मात्र जादा व्याजदर बॅंका आकारत असतात. त्यामुळे पर्सनल लोन काढताना नीट व्याजदर माहीती करुन कमी व्याज असणाऱ्या बॅंकांची निवड केली जाते. पाहा पाच बॅंकांचे व्याजदर काय आहेत ?
मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : घरासाठी किंवा कारसाठी काढाव्या लागत असलेल्या कर्जापेक्षा पर्सनल लोनचे व्याजाचा दर जादा असतो. त्यामुळे पर्सनल लोन काढताना सर्व बॅंकाच्या पर्सनल लोनची माहीती काढून त्यानूसार आपले व्याज वाचविले पाहीजे. तसेच ज्यांच्या क्रेडीट स्कोर चांगला असतो त्यांना देखील बॅंक कर्ज देताना कमी व्याज दर लावत असतात. तर पाहूया कोणत्या बॅंका पर्सनल लोनसाठी किती व्याज दर आकारतात ते….
जेव्हा तुमच्याकडे खर्चासाठी पैशाची कमतरता असते अशावेळी छोट्या मोठ्या खर्चासाठी पर्सनल लोन काढावे लागते. परंतू इतर कर्जापेक्षा या पर्सनल लोन जादा व्याजदर लावले जाते. त्यामुळे बॅंकेची निवड करताना थोडा विचार करुन माहीती काढायला हवी आहे. विविध बॅंका पर्सनल लोनसाठी वेगवेगळे व्याजदर आकारीत असतात. तर पाहूयात विविध बॅंकांचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर पाहूयात.
बॅंक ऑफ महाराष्ट्राचे व्याजदर –
20 लाख रुपयापर्यंतच्या पर्सनल लोनसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र 84 महिन्यांच्या अवधीसाठी 10.00 टक्के वार्षिक व्याज दर आकारते.
पंजाब एण्ड सिंध बॅंकचे व्याज दर –
3 लाख रुपयांपर्यंतच्या पर्सलन लोनसाठी पंजाब एण्ड सिंध बॅंक 10.15 टक्के ते 12.80 वार्षिक व्याजदर आकारत असते.
बॅंक ऑफ इंडीयाचे पर्सनल लोनचे व्याजदर –
20 लाख रुपयांच्या कर्जाऊ रक्कम आणि 84 महिन्यांच्या अवधीसाठी बॅंक ऑफ इंडीया 10.25 टक्के वार्षिक व्याजदर आकारते.
इंडसइंड बॅंकचे पर्सनल लोनचे व्याज दर –
30,000 रुपयांहून अधिक किंवा त्याएवढ्या 25 लाख रुपयांच्या पर्सनल लोनसाठी इंडसइंड बॅंक 12 महिन्यापासून ते 60 महिन्यांच्या अवधीसाठी 10.25 टक्के ते 32.02 चे व्याज दर आकारते.
बॅंक ऑफ बडोदा ( BoB ) पर्सनल लोनचे व्याज दर
50, 000 रुपयांपासून 20 लाखापर्यंतची कर्जाऊ रक्कमेसाठी बॅंक ऑफ बडोदा ( BoB) 10.35 टक्के ते 17.50 टक्के वार्षिक व्याजदर आकारले जाते. त्याचा कार्यकाळ ते 48 ते 60 महिन्यांचा असणार आहे.