आता म्हातारपण आरामात जाणार, 5 वर्षांच्या एफडीवर या 5 बॅंका ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज

म्हातारपण सुखात जावे यासाठी हल्ली एफडीवर चांगले व्याज मिळत होते. या खालील पाच बॅंकांत पाच वर्षांच्या एफडीवर आठ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.

आता म्हातारपण आरामात जाणार, 5 वर्षांच्या एफडीवर या 5 बॅंका ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज
FD Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 12:44 PM

नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : वाढत्या महागाईत जर आपले म्हातारपण सुखात घालवायचं आहे, तर आजकाल बॅंकांत एफडीवर चांगलं व्याज मिळत आहे. अनेक बॅंकांमध्ये एफडीवर चांगले व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर एफडीवर सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेचस चांगले व्याज दिले जाते. आज आपण पाच अशा बॅंका पाहणार आहोत ज्या पाच वर्षांच्या एफडीवर सिनियर सिटीझनला चांगले व्याज देत आहेत.

एफडीवर गुंतवणूक करणे नेहमीच चांगली फायदेशीर ठरत आहे. आता अनेक बॅंका सिनियर सिटीजनसाठी फिक्स्ड डीपॉझिट इंटरेस्टमध्ये वाढ करीत आहेत. त्यात Indusind Bank, Axis Bank सह अनेक बॅंकांचा समावेश आहे. खालील बॅंका फिस्क्ड डीपॉझिट्सवर जादा व्याज देत आहेत.

1 ) DCB BANK – डीसीबी बॅंक पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट ( FD ) वर 8 टक्के व्याज देत आहेत. हे व्याजदर केवळ सिनियर सिटीझनना देत आहेत.

2 ) Indusind Bank – इंडसइंड बॅंक देखील आपल्या सिनियर सिटीझन ग्राहकांना पाच वर्षांच्या फिक्स्ड डीपॉझिट ( FD ) वर 8 टक्के व्याज देत आहे.

3) Axis Bank – एक्सिस बॅंक देखील सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत सिनियर सिटीझन्सना पाच वर्षांच्या फिक्स्ड डीपॉझिट योजनेवर 7.75 टक्के व्याज देत आहे.

4) Yes Bank – यस बॅंक देखील आता 5 वर्षांच्या फिक्‍स्‍ड डिपॉजिट (FD) वर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.

5 ) IDFC First Bank – आयडीएफसी फर्स्ट बॅंकने देखील आपल्या ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.

जादा व्याजावर टीडीएस भरावा लागतो

टॅक्स सेव्हींग एफडी योजनेवर कोणताही कर भरावा लागत नाही. परंतु, आपण गुंतवलेल्या पैशांवर वर्षभरात जर 40 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाला तर मात्र कर भरावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत, ही सूट मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत आहे. मॅच्युरिटी झाल्यावर, बँक TDS कापल्यानंतर शिल्लक रक्कम भरते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.