AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rule Change : LPG च्या भावापासून ते सोन्याच्या विक्रीपर्यंत, असा होणार बदल

Rule Change : 1 एप्रिलपासून एलपीजी, सोने, कर, विमा, कार यांच्यापासून अनेक गोष्टींचे भाव बदलणार आहेत. त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होईल.

Rule Change : LPG च्या भावापासून ते सोन्याच्या विक्रीपर्यंत, असा होणार बदल
असा होईल बदल
| Updated on: Mar 30, 2023 | 10:42 AM
Share

नवी दिल्ली : दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक मोठे बदल होतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक बाबीवर त्याचा परिणाम होतो. एका दिवसानंतर एप्रिल महिना सुरु होत आहे. तर 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष (Financial Year) 2023-24 ची पण सुरुवात होत आहे. यावेळी अनेक सेवा-सुविधांमध्ये, वस्तूंच्या किंमतीत मोठा बदल (Big Change) होणार आहे. यावेळी ही यादी लांबलचक आहे. 1 एप्रिल 2023 रोजी पासून सिलेंडरचे भाव बदलतील. भावात वाढ होईल की जैसे थे परिस्थिती राहील, हे लवकरच कळेल. सोन्याच्या विक्रीसंबंधी आता नवीन नियम लागू होतील. हॉलमार्कशिवाय सोने विक्री करता येणार नाही.

एलपीजीचे भाव

सरकारी गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे भाव जाहीर करतात. या किंमतीत बदल होतो. कंपन्या नवीन भाव जाहीर करतात. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कंपन्यांनी झटका दिला होता. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 50 रुपयांनी घसरल्या होत्या. तर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती 350 रुपयांनी वधारल्या होत्या. आता 1 एप्रिल रोजी कंपन्या महागाईचे गिफ्ट देतात कि दिलासा ते लवकरच कळेल.

हॉलमार्क क्रमांक अनिवार्य

ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.

जीवन विमा पॉलिसी

5 लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमपेक्षा अधिक जीवन विमा हप्त्यातून होणारे उत्पन्न आता करपात्र असेल. नवीन आर्थिक वर्षात, म्हणजेच 1 एप्रिल 2023 रोजीपासून हे उत्पन्न करपात्र ठरेल. त्यावर गुंतवणूकदारांना कर द्यावा लागेल .

नवीन कर व्यवस्था लागू

केंद्र सरकार नवीन कर व्यवस्था (New Tax Regime) 1 एप्रिलपासून लागू होईल. नवीन कर व्यवस्थेत केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये 7 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. करदात्यांनी जुनी कर व्यवस्था निवडली तर त्यांना या सवलतीवर पाणी सोडावे लागेल. 1 एप्रिलपासून हा नियम लागू होईल.

इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल

नवीन कर व्यवस्थातंर्गत कर रचनेत 0 ते 3 लाख रुपयांवर शून्य, 3 ते 6 लाखांवर 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के, 9 ते12 लाखांवर 15 टक्के आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के सवलत मिळेल. एलटीए मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी नसणाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंट 2002 नुसार, 3 लाख रुपये होती. त्यात आता भरघोस वाढ करुन 25 लाख करण्यात आली आहे.

डेट फंडवर कर सवलत नाही

सध्याच्या काळात डेट फंडमध्ये गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिटचा कर फायदा मिळतो. जर कोणी डेट फंडमध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवल्यास, इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन कर लावल्या जातो. वास्ताविक, फिक्स्ड डिपॉझिटवर मिळत असलेले व्याज टॅक्स स्लॅबनुसार मिळते. प्रस्तावानुसार, तीन वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत डेट फंडाच्या इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही 20% टॅक्स बेनिफिटसाठी पात्र नसाल.

कार महागणार

1 एप्रिल 2023 रोजीपासून कार तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या उत्पादनात वाढ करण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या काही दिवसात कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या तीन दिवसांत तुम्हाला वाहन खरेदी करता येईल. 1 एप्रिल पासून या कारमध्ये 0BD-2 हे यंत्र बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत वाढ होणार आहे.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.