Salary : सॅलरी अकाऊंटचे फायदे काय? या सुविधा वाचून तुम्ही व्हाल हैराण..

Salary : पगारदार व्यक्तीला बँकेकडून चांगल्या सोयी-सुविधा मिळतात..तुम्हाला माहिती आहेत का?

Salary : सॅलरी अकाऊंटचे फायदे काय? या सुविधा वाचून तुम्ही व्हाल हैराण..
या मिळतात सुविधा Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 8:19 PM

नवी दिल्ली : पगारदार व्यक्तींसाठी बँकेत सॅलरी अकाऊंट (Salary Account) असते. या खात्यातंर्गत ग्राहकांना बँका (Bank) अनेक सोयी-सुविधा देतात. या कोणत्या सुविधा असतात. त्यातून पगारदार व्यक्तीला (Salaried Person) काय फायदा होतो, ते पाहुयात..

Salary Account मध्ये प्रत्येक महिन्याला वेतन जमा करण्यात येते. कंपनी, फर्म अथवा कारखानदार यामध्ये कर्मचाऱ्यांचा मेहनताना जमा करतो. हे एक प्रकारचे बचत खातेच असते. यामध्ये चेकबुक, एटीएम, नेटबँकिग, क्रेडिट कार्ड इत्यादी सुविधा मिळतात.

बचत खात्यासारख्याच सुविधा मिळत असल्या तरी या खातेदारांना बँका अनेक काही सोयी-सुविधा देतात. त्यामुळे सॅलरी अकाऊंट बचत खात्यापेक्षा थोडे वेगळे ठरते. ग्राहकांना अनेक फायदे मिळतात.

हे सुद्धा वाचा

सॅलरी अकाऊंट हे झिरो बॅलन्स खाते असते. जर तीन महिन्यांपर्यंत तुमच्या खात्यात एक छदामही नसला तरी बँक तुम्हाला कुठलेही शुल्क आकारत नाही. तर बचत खात्यात एक ठराविक रक्कम ठेवणे आवश्यक असते. नाहीतर भूर्दंड बसतो.

अनेक बँका पगारदार व्यक्तीला फ्री एटीएम ट्रंझेक्शन सुविधा देते. या बँकांमध्ये एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक इत्यादी बँकांचा समावेश आहे. त्यामुळे ठराविक मर्यादेबाहेर तुम्ही एटीएममधून रक्कम काढली तरी त्याचा भूर्दंड बसत नाही.

पगारदार व्यक्तीला वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज वा गृह कर्जासाठी फारसा ताण येत नाही. त्यांना बँक हे कर्ज लवकर मंजूर करते. कारण त्यांच्याविषयीची जोखिम कमी असते.

वेतनदाराचे दर महिन्याच्या उत्पन्नाचा घोषवारा (Account Statement) बँकेकडे ही उपलब्ध असल्याने त्याआधारे कागदपत्रांची पूर्तता करणे किचकट ठरत नाही. कर्ज मिळणे सोपे होते.

जर वेतन अधिक असेल तर बँकेत वेल्थ सॅलरी अकाऊंट उघडता येते. या खात्यातंर्गत बँक तुम्हाला एक वेल्थ मॅनेजर मदतीसाठी देतो. हा मॅनेजर तुम्हाला बँकेशी संबंधित सर्व कामे करण्यास मदत करतो.

लॉकर शुल्कावर वेतनधारकाला 25 सवलत मिळते. पगार जमा झाल्याचा एसएमएस तुम्हाला प्राप्त होतो. त्यासाठी बँक कुठलेही शुल्क आकारत नाही. ही सुविधा बँक मोफत पुरविते.

काही सरकारी आणि खासगी बँका ग्राहकांना मोफत ऑनलाईन व्यवहाराची सुविधा देतात. सध्या IMPS आणि स्टँडिंग इन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला शुल्क अदा करावे लागते. तर NEFT आणि RTGS सुविधा मोफत मिळते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.