Insurance | दोन लाखांपर्यंतच्या विम्याचे मोफत कवच..जाणून घ्या कोणाला होईल फायदा..
Insurance | असंघटित क्षेत्रातील श्रमिक आणि मजुरांना केंद्र सरकार अनेक योजनांद्वारे फायदे मिळवून देते. या क्षेत्रातील कामगारांसाठीही विम्याचे कवच आहे.
नवी दिल्ली : या सरकारी योजनेत श्रमिक आणि मजुरांना (Labour)दोन लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा (Insurance) लाभ मिळतो. देशात मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रात (Unorganized Sector) कामगार काम करत आहेत. विमा खरेदी करणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे.
कामगारांना आर्थिक सहाय देण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम योजना (e-Sharm Scheme) आणली आहे. या योजनेत असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्ड तयार करता येते. त्याआधारे विम्याचा लाभ घेता येतो.
ई-श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना नोंदणी करावी लागेल. त्यासाठी अगोदर कामगारांना ई-श्रम पोर्टलवर eshram.gov.in नोंदणी करावी लागेल. या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचा पर्याय निवडावा लागतो.
ई-श्रम पोर्टलवर कोणत्याही असंघटित क्षेत्रातील कामगाराला नोंदणी करता येते. या पोर्टलद्वारे कामगार, मजुरांना अनेक योजनांचे लाभ देण्यात येतात. त्यासाठी त्यांनी स्वतःहून या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. काही कागदपत्रांआधारे ही नोंदणी करता येते.
नोंदणीकृत कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेत मजुराला 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच मिळते. हा विमा कामगारांना मोफत दिल्या जातो.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचा पूर्ण डाटा या संकेतस्थळावर उपलब्ध राहतो. त्याच्या आधारे अनेक योजनांचा फायदा कामगारांना देण्यात येतो.
e-Sharm card च्या माध्यमातून कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, सार्वजनिक वितरण सेवा, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता योजना, आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री रोजगार योजनांचा लाभ घेता येतो.