Today 30 May 2022 Petrol, Diesel rates: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मे रोजी केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साइज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आली होती. एक्साइज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यात देखील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट (Value-Added Tax) कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पेट्रोल (Petrol),डिझेल आणखी स्वस्त झाले. तेव्हापासू देशासह राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. आज पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलता दर प्रति लिटर 102.63 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर अनुक्रमे106.03 आणि 92.76 रुपये इतका आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार राज्यात आणि देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111. 30 तर डिझेलचा रेट प्रति लिटर 98 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे प्रति लिटर 112.97 आणि 98.89 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 रुपये इतका आहे.
इतर इंधनाच्या दरात वाढ
केंद्राने एक्साईज ड्यूटीमध्ये कपात केल्याने देशात पेट्रोल, डिझेलचे दर काहीसे स्वस्त झाले आहेत. मात्र दुसरीकडे इतर इंधनाच्या दरात वाढ सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. सीएनजी, पीएनजी गॅसचे दर एका ठरावीक काळानंतर सातत्याने वाढवले जात आहेत. दुसरीकडे एलपीजी गॅस देखील महागला आहे. या महिन्याच्या एक तारखेलाच व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर देखील 50 रुपयांनी चालू महिन्यात महाग झाला आहे. भाजीपाल्यापासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वच गोष्टींचे दर वाढल्याने सामान्य माणूनस महागाईपुढे हातबल झाला आहे.