Today petrol, diesel rates: कच्च्या तेलाचे दर गेल्या दहा वर्षांतील सर्वोच्च स्थरावर, इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

कच्च्या तेलाचे दर गेल्या दहा वर्षांतील सर्वोच्च स्थरावर पोहोचले आहेत. आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले. जाणून घेऊयात आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

Today petrol, diesel rates: कच्च्या तेलाचे दर गेल्या दहा वर्षांतील सर्वोच्च स्थरावर, इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव
आजचे पेट्रोल, डिझेल रेट
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 7:36 AM

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून, पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. 22 मे रोजी केंद्र सरकारकडून (Central Government) पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्यात आली होती. एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude oil price) दर गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाचे दर गेल्या दहा वर्षांतील सर्वोच्च पातळीला पोहोचलेत. आज कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल 122 डॉलर एवढे आहेत. कच्चा तेलाच्या दरात तेजी असताना देखील भारतात पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 22 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3597.28
पुणे111. 3098
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

प्रमुख महानगरातील इंधनाचे दर

आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा रेट प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे. महानगरातील पेट्रोलच्या भावाची तुलना करायची झाल्यास सध्या सर्वाधिक स्वस्त पेट्रोल हे दिल्लीमध्ये मिळत असून, सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा

कच्च्या तेलाची मागणी वाढली

सध्या रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. रशियातून होणारी कच्च्या तेलाची आयात देखील बंद केली आहे. त्यामुळे रशियात कच्च्या तेलाचा मोठा साठा निर्माण झाला होता. रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाचा पुरवठा केला. मात्र आता भारत आणि चीनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीचा धडाका लावल्याने मागणीत वाढ झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.