Today’s gold-silver prices: आज सोन्याचे दर स्थिर, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव
आज सोन्याचे दर स्थिर असून, चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. मंगळवारी चांदीचे दर प्रति किलो मागे 2,150 रुपयांनी वाढले आहेत.
मुंबई : आज सोन्याचे दर (gold prices) स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार 22 कॅरट सोन्याचे (gold) दर प्रति तोळा 46,250 आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50, 450 इतके आहेत. सोमवारी देखील 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46, 250 रुपये इतके होते. तर 24 कॅरट सोन्याचे भाव 50, 450 रुपये इतके होते. याचाच अर्थ आज देशात सोन्याचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे मात्र चांदीचे (silver) भाव वधारले असून, चांदीच्या दरात किलो मागे 2,150 रुपयांची वाढ पहायला मिळत आहे. आज चांदीचे दर प्रति किलो 61,550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 59,400 रुपये इतके होते. सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
आज देशासह राज्यात सोन्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, सोन्याचे दर स्थिर आहेत. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,550 रुपये असून 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,780 रुपये इतके आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,600 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर 50,820 रुपये प्रति तोळा इतके आहेत. नागपूरमध्ये 24 व 22 कॅरट सोन्याचे दर अनुक्रमे 46,600 आणि 50,820 रुपये प्रति तोळा इतके आहेत. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,600 रुपये असून 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,820 रुपये इतके आहेत.
चांदीचा भाव वधारला
दरम्यान आज जरी सोने स्थिर असले तरी दुसरीकडे मात्र चांदीचे भाव वधारल्याचे पहायला मिळत आहे. आज चांदीच्या दरात 2,150 रुपयांची वाढ पहायला मिळत आहे. चांदीचे दर प्रति किलो 61,550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 59,400 रुपये इतके होते. सध्या देशासह जगभरात चांदीची मागणी वाढताना दिसून येत आहे.
सोन्याच्या मागणीत वाढ
सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विवाह समारंभात सोन्याला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या देशात सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र तरी देखील सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून स्वस्त होत असल्याचे पहायला मिळत आहेत. गेल्या महिनाभरात सोन्याचे दर प्रति तोळा तीन हजारांपेक्षा अधिक स्वस्त झाले आहेत. सोन्याचे दर स्वस्त होत असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे.