Today’s petrol diesel rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

आज सलग 43 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Today's petrol diesel rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
पेट्रोल डिझेलचे दर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 6:51 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग 43 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर (Today’s petrol and diesel prices) स्थिर आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात चढउतार पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशात गेल्या सहा एप्रिलपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात इंधनाच्या दरात (Fuel prices) मोठी वाढ पहायला मिळाली होती. या काळात इंधनाचे दर प्रति लिटर मागे तब्बल दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढले. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. केंद्राने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोलच्या दरात पाच रुपये तर डिझेलच्या दरात दहा रुपयांची कपात झाली होती. आता राज्यांनी देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करावी असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

देशाच्या प्रमुख महानगरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये असून डिझेलचा भाव 104.77 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 115.12 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 99.83 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये लिटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

राज्यात देखील आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून भाव स्थिर आहेत. राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.40 तर डिझेलचा भाव 103.73 रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 121.30 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 104. 50 रुपये आहे. पुण्यात पेट्रोल व डिझेलचा दर अनुक्रमे 120.20 आणि 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे.

हे सुद्धा वाचा

इतर इंधनाच्या दरात वाढ

दरम्यान इकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र एलपीजी, सीएनजी, पीएनजी गॅसच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी घरगुती गॅस सिलिंडर साडेतीन रुपयांनी तर व्यवसायिक सिलिंडर आठ रुपयांनी महाग करण्यात आले आहे. या महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड
sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड.
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा.
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला.
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर.
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस.
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.