Trading tips: आज बाजारात कमाईची संधी; या शेअरमध्ये होईल उलाढाल
कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा वृद्धी दिसत आहे. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन संघर्षामुळे महागाईला फोडणी बसली आहे.
बुधवारी शेअर बाजारात (Share Market) फायदाचे गणित दिसून आले. प्रमुख निर्देशांक (Sensex) अर्ध्या टक्क्याच्या घसरणीसह बंद झाले. सध्या रशिया-युक्रेन (Russia-Ukraine Crisis) संघर्षाचे संकट आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतारामुळे बाजारपेठेवर अनिश्चितेचे सावट आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा अस्थिर परिस्थितीत गुंतवणुकदारांनी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. जर तुम्ही ही आज शेअर बाजारात फायद्याचा सौदा करायच्या विचारत असाल तर या स्टॉकवर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. एक गोष्ट मात्र नक्की की हा गुंतवणुकीचा सल्ला नक्कीच नाही. पण, तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोमध्ये या शेअरला स्थान देऊन पहा. अभ्यास करा आणि नंतर गुंतवणुकीचा विचार करा. सध्या मार्केट महागाई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे दबावाखाली आहे, तेव्हा हे स्टॉक भविष्यात लंबी रेस के घोडे असतील, कारण या शेअरची सध्या चर्चा आहे.
विदेशी बाजाराचे संकेत काय आहेत कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून आली. ब्रेंट क्रुड तेलाच्या किंमतींनी 120 डॉलर प्रति बॅलरचा टप्पा ओलांडला. इंधन दरवाढीचा फटका भारतीय बाजाराला बसू शकतो. यामुळे सर्वच क्षेत्रात दरवाढ होऊन महागाईचे चटके सर्वसामान्य नागरिकाला सहन करावे लागतील. तर अमेरिकन बाजारातही सुरुवातीच्या सत्रात घसरण दिसून आली. सुरुवातीच्या सत्रात डाओ जोंस, अर्ध्या टक्क्यांहून घरसला. रशिया-युक्रेनमधील संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. या दोन्ही देशातील युद्ध टोकास पोहचले आहे. सहाजिकच या सर्व घडामोडींचा फटका भारतीय बाजारावर दिसून येईल. बुधवारी भारतीय शेअर बाजार घसरणीनंतर बंद झाला. सुरुवातीच्या सत्रात आगेकूच करणा-या बाजारात नफावसुली झाली. आज याच गृहपाठासह बाजार आगेकुच करु शकतो.
या शेअर्सवर ठेवा लक्ष बाजारात अनेक शेअर्समध्ये बल्क डील झाली. तर येत्या काही दिवसांत अनेक कंपन्यांच्या महत्वपूर्ण बैठकी होत आहेत. या कंपन्यांच्या उलाढालीविषयीच्या चर्चा सध्या बाजारात जोरात सुरु आहे. त्याचा फायदा आणि नुकसान दोन्ही या स्टॉक्सच्या झोळीत पडू शकते. आडवानी हॉटेल्स अॅड रिसोर्ट, एलएंडटी फायनान्स अँड होल्डिंग आणि नॅशनल अॅल्युमिनीयममध्ये बल्क डील दिसू शकते. यासोबतच विजया डायग्नोस्टिक, पीएसपी प्रोजेक्टस, रेमंड, केईआय इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, जीओसीएल कॉर्पोरेशन, अजमेरा रियल्टीज, कृष्णा इंस्टिट्यूट या कंपन्यांच्या बैठकांचे सत्र होईल. यामध्ये गुंतवणुकदार आणि विश्लेषक यांचा सहभाग असेल. यासोबतच आजच रुचि सोयाचा फॉलो ऑन पब्लिक ऑफर बाजारात गुंतवणुकीसाठी उपलब्ध होईल. फिलाटेक्स इंडिया कंपनीचे संचालक मंडळ 29 मार्च रोजी बायबॅकच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. सीएसबी बँकेच्या संचालकांच्या नियुक्ती, जीपीटी इंफ्रा प्रोजेक्ट्स, त्रिवेणी टरबाईन आणि नेल्को या शेअर्सच्या घडामोडींवर गुंतवणुकदार आणि तज्ज्ञाचे बारीक लक्ष आहे.