AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Traffic Challan | घरबसल्या भरा ट्रॅफिक चलन , Paytm सह ऑनलाईन असा भरा दंड

Traffic Challan | वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर आता तुम्हाला UPI, Paytm अथवा ऑनलाईन पद्धतीने चलन भरता येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने दंडाची रक्कम भरण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. अनेक राज्यातील त्या त्या शहरातील पोलिसांनी त्यासाठी खास व्यवस्था केली आहे. त्यामुळे तुम्ही सहज दंडाची रक्कम भरु शकता.

Traffic Challan | घरबसल्या भरा ट्रॅफिक चलन , Paytm सह ऑनलाईन असा भरा दंड
Image Credit source: फाईल फोटो
| Updated on: Jan 06, 2024 | 10:23 AM
Share

नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : भारतात डिजिटल पेमेंटने क्रांती आणली आहे. झटपट आणि सहज रक्कम अदा करता येत असल्याने त्याचा वापर वाढला आहे. या डिजिटल प्रणालीचा वापर वाहतूक पोलिसांनी पण सुरु केला आहे. देशातील अनेक शहरात वाहतूक चलन भरण्यासाठी वाहनधारकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तर काही शहरातील पोलिसांनी पेटीएम वा इतर युपीआयचा वापर सुरु केला आहे. या डिजिटल सेवेमुळे दंडाची रक्कम भरण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. या एपवरुन सहज दंडाची रक्कम भरता येईल.

ऑफलाईन सुविधा

देशातील त्या त्या शहरात ट्रॅफिक चलन भरण्याची ऑफलाईन सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला संबंधित पोलिस स्टेशनमध्ये जावे लागते. ज्या परिसरात तुमच्या वाहनाचे चलन कापण्यात आले. तिथे गेल्यावर अधिकाऱ्याला भेटून चलनाची रक्कम भरावी लागते. ही पद्धत ऑफलाईन आहे. रोख रक्कम दिल्यानंतर अधिकारी तुम्हाला दंडाची पावती देतो. दंडाची रक्कम भरल्यानंतर पावती घ्यायला विसरु नका.

पेटीएमवर पण सुविधा

  • काही शहर पोलिसांनी ही सुविधा केली सुरु
  • पेटीएमवरुन सहज भरता येईल दंडाची रक्कम
  • रिचार्ज आणि बिल पेमेंटवर क्लिक करा
  • या पर्यायामधअये व्ह्यू ऑलवर क्लिक करा
  • यामध्ये तुम्हाला चलन हा पर्याय समोर येईल, त्यावर क्लिक करा
  • यामध्ये तुम्हाला तुमच्या शहराची निवड करावी लागेल
  • त्यानंतर चलनची सविस्तर माहिती भरा, यामध्ये चलन क्रमांक, वाहन क्रमांक यांची माहिती द्या
  • नेक्स्टवर क्लिक केल्यावर पे वर क्लिक करा
  • आता ‘पे ट्रॅफिक चलन’ वर क्लिक करुन प्रक्रिया पूर्ण करा

परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरही भरा चलन

रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) संकेतस्थळावर वाहनधारकांना ऑनलाईन चलन भरता येईल. www.echallan.parivahan.gov.in वर क्लिक करुन चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि तुमचा वाहन परवाना क्रमांक नोंदवावा लागेल. पुढील प्रक्रिया करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल. अनेक शहरात इतर युपीआय पेमेंट एपचा पण वापर करण्यात येतो. तुमच्या शहरातील पोलीस कोणती सुविधा देतात, त्याची पण माहिती घ्या.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.