AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 जुलैपासून सोनं विकायचं असल्यास ‘ही’ गोष्ट गरजेची, अन्यथा…

Gold | 1 जुलैपासून प्रत्येक दागिन्याची विक्री करताना युनिक आयडेंटिफिकेनश नंबर (UID) गरेजचा असेल. त्यामुळे सोन्याचे दागिने कुठल्या ज्वेलर्समधून खरेदी केले आहेत किंवा कोणत्या हॉलमार्किंग सेंटरमधून प्रमाणित केले आहेत, याची इत्यंभूत माहिती मिळेल.

1 जुलैपासून सोनं विकायचं असल्यास 'ही' गोष्ट गरजेची, अन्यथा...
Gold Silver Price
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 11:37 AM

मुंबई: केंद्र सरकारने सोने खरेदी-विक्रीच्या पारदर्शक व्यवहारासाठी हॉलमार्किंग बंधनकारक आले आहे. 16 जूनपासून देशभरात हा नियम लागू झाला होता. मात्र, काही तांत्रिक गोष्टींमुळे या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी होण्यासाठी साधारण महिनाभराचा काळ जावा लागेल. अशातच आता केंद्र सरकारने सोने विक्रीसाठी (Gold) आणखी एक नियम लागू करण्याची तयारी सुरु केली आहे. (UID will be madatory for jewellery from 1 July 2021)

त्यानुसार 1 जुलैपासून प्रत्येक दागिन्याची विक्री करताना युनिक आयडेंटिफिकेनश नंबर (UID) गरेजचा असेल. त्यामुळे सोन्याचे दागिने कुठल्या ज्वेलर्समधून खरेदी केले आहेत किंवा कोणत्या हॉलमार्किंग सेंटरमधून प्रमाणित केले आहेत, याची इत्यंभूत माहिती मिळेल.

हॉलमार्किंगच्या अंमलबजावणीसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क (Gold Hallmarking) असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने नोटांबदी आणि जीएसटीप्रमाणेच या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नियम लागू होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही नोंदणी प्रणालीत बरेच बदल बाकी आहेत. त्यामुळे आता Gold Hallmarking ची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.

‘या’ शहरांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर व सोलापूर या 22 जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्कचे दागिने विकणे बंधनकारक आहे.

कोणत्या गोष्टींना हॉलमार्किंगच्या नियमातून सूट?

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

(UID will be madatory for jewellery from 1 July 2021)

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....