Unique Digital Health ID card | युनिक डिजिटल हेल्थ आयडी, आरोग्याच्या जन्मकुंडलीची स्टेप बाय स्टेप माहिती

Unique Health ID card एक प्रकारे तुमच्या आरोग्याची कुंडली आहे. यामुळे तुम्ही कोणत्या आरोग्याच्या तक्रारीवर उपचार घेतले हे संगणकाच्या एक-दोन क्लिकवर समोर येईल. विशेष म्हणजे देशभरात तुम्ही कुठेही गेलात तर डॉक्टरला तुमच्या आरोग्याची ए टू झेड माहिती मिळेल.तर या कार्डची महत्ती जाणून घेऊयात...

Unique Digital Health ID card | युनिक डिजिटल हेल्थ आयडी, आरोग्याच्या जन्मकुंडलीची स्टेप बाय स्टेप माहिती
Digital Health ID Card : प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 7:39 AM

मुंबई : भारतीयांसाठी जन्मकुंडली हे जीवनाचे ID card आहे. त्याआधारेच त्याच्या आयुष्यात घटनाक्रम मागेपुढे घडतो, अशी धारणा आहे आणि त्यासंबंधीचे उपाय आहेत. तर आता त्याहीपेक्षा महत्वाची कुंडली केंद्र सरकार तयार करत आहे. ती आहे तुमची आरोग्य कुंडली. तुम्ही म्हणाल ही काय नवीन भानगड. तर मित्रांनो हे आहे तुमच्या आरोग्याचे मिशन. तुमच्या आरोग्याविषयी इंत्यभूत माहिती साठवलेले डिजिटल हेल्थ कार्ड.

Unique Health ID card आयुष्यमान भारत डिजिटल मिशन (Ayushman Bharat Digital mission) चा एक भाग आहे. या कार्डच्या मदतीने देशभरातील मोजक्या रुग्णालयात उपाचाराची सुविधा देण्यात आली आहे. डिजिटल हेल्थ मिशनतंर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड (Unique Health ID card) तयार करत आहे. डिजिटल हेल्थ कार्ड आधारकार्डप्रमाणेच पुर्णतः डिजिटल कार्ड आहे. आधार कार्डप्रमाणेच तुम्हाला हेल्थकार्डचा क्रमांक मिळणार. या कार्डमध्ये तुमच्या आरोग्याशी संबंधित इत्यंभुत माहितीची नोंद असेल. या आरोग्य कार्डमुळे डॉक्टरांना तुमच्या आरोग्याचे रिकॉर्ड बघायला मिळतील. म्हणजेच तुम्ही यापूर्वी कोणत्या रोगावर काय इलाज केला, काय उपचार घेतले, कोणती शस्त्रक्रिया केली. कोणती औषधी तुम्ही घेत आहात याची संपूर्ण माहितीची डॉक्टरांना मिळते.

आता फाईलची चिंता सोडा

Unique Health ID card मुळे तुमची आरोग्य कुंडली तयार होते. भारतात तुम्ही कुठेही गेलात आणि संबंधित हॉस्पिटल या योजनेतंर्गत येत असेल आणि तुमच्याकडे रोग आणि त्यावरील इलाजाची माहिती असलेली फाईल नसेल तरी ही डॉक्टरला तुमच्यावर सुरु असलेल्या उपचारांची, तुम्ही घेत असलेल्या औषधांची संपूर्ण माहिती अगदी काही सेकंदात मिळेल. तुमच्यावर यापूर्वी कोठे इलाज करण्यात आले. संबंधित डॉक्टर कोण आहेत. त्यांनी तुम्हाला कोणती औषधी दिली. याची इत्यंभूत माहिती या Unique Health ID card मध्ये समाविष्ट असेल. त्यामुळे तुम्हाला कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी बाहेर पडायचे असेल आणि तब्येत बिघडल्यास फाईल सोबत ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच या युनिक कार्डमुळे तुम्हाला त्याठिकाणी उपचारांसाठी एखाद्या सरकारी योजनेची मदत होईल का याचीही माहिती मिळेल.

असे बनवा Unique Health ID card

जर तुम्हाला Unique Health ID card तयार करायचे असेल तर, www.healthid.ndhm.gov.in या सरकारी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. तुम्ही तुमच्या मोबाईलवर ABDM हे हेल्थ रिकॉर्ड अप ही डाऊनलोड करु शकता. या अप मार्फतही तुम्ही हेल्थ आयडी कार्डसाठी नाव नोंदणी करु शकता. यामध्ये तुम्हाला तुमची महत्वपूर्ण माहिती जमा करावी लागेल. तसेच मोबाईल क्रमांक आणि आधारकार्ड क्रमांकाचे व्हेरिफिकेशन करावे लागेल.

अशी आहे ऑनलाईन प्रक्रिया

  • हेल्थ आयडी कार्ड तयार करण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन NDHM च्या वेबसाईटवर जा.
  • Create Your Health ID हा पर्याय निवडा
  • Generate via Aadhar आधारकार्ड मार्फत कार्ड तयार करण्यासाठी
  • याठिकाणी आधारकार्ड क्रमांक टाका. सहमती द्या. सबमिट करा.
  • मोबाईलवर व्हेरिफाय करा
  •  तुमचा 14 अंकी हेल्थ आयडी कार्ड क्रमांक तुम्हाला मिळेल
  • त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा. सबमिट करा
  • तुमचे हेल्थ आयडी कार्ड तयार होईल.

संबंधित बातम्या :

हवाई क्षेत्राला ‘अच्छे दिन’; ‘गो फर्स्ट’ची सुपरडुप्पर ऑफर, नव्या वर्षाचा प्लॅन करताय?

मतदान कार्ड, पासपोर्ट पेक्षाही आधार कार्ड महत्त्वाचे; तुम्हाला आधारचे हे उपयोग माहिती आहेत का?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.