AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक ओटीपी आणि UPI द्वारे सेकंदात व्यवहार, डेबिटकार्डद्वारे ओळख प्रमाणिकरणाची गरज इतिहासजमा

अनेकदा व्यवहार पूर्तता करण्यासाठी बँक अथवा मर्चंट तुमची ओळख पटवण्यासाठी डेबिट कार्डची माहिती मागतात. त्याद्वारे पुढील व्यवहार पूर्ण होतात. पण आता ही पद्धत इतिहास जमा होणार आहे. केवळ एका ओटीपीआधारे तुम्हाला युपीआय द्वारे सेकंदात व्यवहार करता येईल. लवकरच बँका याविषयीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणार आहेत.

एक ओटीपी आणि UPI द्वारे सेकंदात व्यवहार, डेबिटकार्डद्वारे ओळख प्रमाणिकरणाची गरज इतिहासजमा
UPI द्वारे सेकंदात व्यवहार Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 8:59 AM

भारतात असा एक मोठा वर्ग आहे की, ज्यांच्याकडे डेबिट कार्ड (Debit Card) नाही, तरी ते युपीआय चा वापर करु शकतील. वास्तविक या मार्चच्या मध्यापर्यंत ही सुविधा उपलब्ध होणार होती. मात्र तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने ही योजना लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या आधारकार्ड आधारे युपीआय (Aadhar Card base UPI) सुरु करण्याचा हा पर्याय ग्रामीण भागातील लोकांना व्यवहार करताना क्रांतीकारक ठरणार आहे. सध्या यासाठी काही कालावधी लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (National Payment Corporation of India) सप्टेंबर 2021 मध्ये या फीचरची घोषणा केली होती.

आधाराकर्डशी संलग्नीत मोबाईल क्रमांक, बँक खात्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल क्रमांक आणि युपीआयसाठी वापरण्यात येणारा मोबाईल क्रमांक एकच असावा लागेल. राष्ट्रीय देयके महामंडळाने 15 डिसेंबर 2021 पर्यंत बँकांना ही सेवा लागू करण्यास सांगितले होते. त्यानंतर याविषयीची कालमर्यादा 15 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतू, अद्यापही बँका ही योजना कार्यान्वीत करण्यात, सक्षमपणे सक्रीय करण्यात यशस्वी झालेल्या नाहीत. आधारकार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या ओटीपीवरुन ग्राहक लवकरच व्यवहार आणि रक्कमेचे आदान-प्रदान करु शकतील. तसेच हा सर्वात सुरक्षित आणि सोपा पर्याय नागरिकांसाठी असेल, असे निवेदन 8 सप्टेंबर 2021 रोजी देण्यात आले होते. राष्ट्रीय देयके महामंडळ आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(UIDAI) हे मॉडल कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी अनेक बँका, त्यांचे अॅल्पिकेशन्स आणि पेमेंट गटवे यासाठी ग्राहकाच्या डेबिट कार्डचा वापर करण्यात येतो. ही माहिती मिळल्यानंतर पुढील व्यवहार पूर्ण होतो. परंतू, आता ही पद्धत इतिहासजमा होईल. लवकरच नागरिक डेबिट कार्डची सविस्तर माहिती न देताच डिजिटल व्यवहाराची पूर्तता करु शकतील. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा लाब मिळणार आहे. त्यांची व्यवहार करण्याची क्षमता कित्येक पटीने वाढून त्यांना नाहक बँकांच्या पाय-या झिजवाव्या लागणार नाही. तसेच डेबिट कार्ड नसल्याने ज्यांना सध्या सक्षमपणे डिजिटल व्यवहार पूर्ण करता येत नाही, अशा नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे.

आधारकार्डचा व्यवहारांना आधार

ही नवी व्यवहार पद्धत डेबिट कार्डला पुर्णतः हद्दपार करणार आहे. नोंदणीवेळी एकदा आधार कार्डचा क्रमांक दिल्यानंतर पुढील सर्व व्यवहार केवळ आधारकार्डसंबंधीचा तुमचा डाटा वापरुनच पूर्ण करण्यात येतील. आधाराकर्डशी संलग्नीत मोबाईल क्रमांक, बँक खात्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल क्रमांक आणि युपीआयसाठी वापरण्यात येणारा मोबाईल क्रमांक एकच असावा लागेल. आधार नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी आल्यानंतर व्यवहाराची पूर्तता होईल.

संबंधित बातम्या :  सरकारी कार्यालयात Mobile वापरावर बंदी येणार? मद्रास हायकोर्टात मोबाईलच्या वापरावर महत्त्वपूर्ण सुनावणी

जुनी की नवी पेन्शन योजना लागू होणार? जाणून घ्या अर्थ राज्यमंत्री काय म्हणाले

हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल.
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी.
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच....
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल.