AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI एकावेळी किती रक्कम करता येते ट्रान्सफर , जाणून घ्या काय आहेत नियम

यूपीआयमधील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पेमेंट नाकारल्यास पैसे लगेच पैसे भरणाऱ्याच्या बँक खात्यात परत केले जातात. जर तुमच्या खात्यात लगेच पैसे परत येत नसतील तर ज्या बँकेशी यूपीआय लिंक आहे, तुम्ही त्या बँकेशी संपर्क साधू शकता . यूपीआयशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला त्याच बँकेशी संपर्क साधावा लागेल ज्या बँकेशी यूपीआय जोडला गेला आहे.एका वेळी आपण किती पैसे ट्रान्सफर करू शकता, जाणून घ्या काय आहे नियम आहे.

UPI एकावेळी किती रक्कम करता येते ट्रान्सफर , जाणून घ्या काय आहेत नियम
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 1:40 PM

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ही रोख रक्कम त्वरित हस्तांतरित अरण्याची (Instant Payment) सर्वात अचूक प्रणाली आहे. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने ही प्रणाली विकसित केली आहे. एनपीसीआयचे नियमन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे केले जाते. यूपीआय पेमेंट सिस्टमच्या आयएमपीएस पायाभूत सुविधांवर तयार केले गेले आहे. ज्यामध्ये आपल्याला त्वरित पैसे हस्तांतरण (MONEY TRANSFER)सुविधा मिळते. हा निधी दोन्ही ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये अवघ्या काही वेळातच वर्ग केला जातो. पण या निधी हस्तांतरणाला मर्यादा आहे. आपण त्या मर्यादेच्या पलीकडे यूपीआयद्वारे निधी हस्तांतरित करू शकत नाही. प्रत्येक व्यवहारासाठी ही मर्यादा 2 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे व्यवहार अपूर्ण राहिल्यास अथवा रद्द झाल्यास रक्कम पाठविणाऱ्याच्या खात्यात पुन्हा जमा होते.

यूपीआय ॲप वापरण्यासाठी तुम्हाला यूपीआय पिन तयार करावा लागेल. हा पिन आपण एटीएमचा पिन तयार करतो तसाच आहे. आपण स्वतः यूपीआयचा पिन तयार करू शकतो, जो 4-6 अंकांचा पासकोड आहे. पहिल्यांदा नोंदणी करताना कोणत्याही यूपीआय अॅपवर पिन जनरेट करावा लागतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादा व्यवहार कराल तेव्हा तुम्हाला हा पिन टाकावा लागेल. हा पिन टाकल्याशिवाय व्यवहार यशस्वी होणार नाही. यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग बिल पेमेंटही करता येणार आहे. ज्या दुकानदाराकडे युपीआय व्यवहार प्रणाली आहे, त्यांच्याकडेच युपीआय पेमेंट अदा करता येते.

हे सुद्धा वाचा

यूपीआयकडून पेमेंट कसे करावे

ऑनलाइन व्यापाऱ्याच्या प्लॅटफॉर्मवर पेमेंट करण्यासाठी, त्याला / तिला त्याच्या / तिच्या पेमेंट पर्यायावर जावे लागेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला abc@upi असा पेमेंट अॅड्रेस टाकावा लागेल, तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या भीम अॅपवर कलेक्शन रिक्वेस्ट मिळेल. इथे तुम्हाला यूपीआय पिन टाकावा लागेल आणि यासोबत तुमचं पेमेंट यशस्वी होईल. हे काम अतिशय सोपे असून पहिल्यांदा कोणाच्याही मदतीशिवाय ते पूर्ण होऊ शकते. तुम्ही व्यापाऱ्याच्या खात्यात रक्कम वळती केली, इंटरनेट नेटवर्क मुद्यामुळे व्यवहार पूर्ण झाला नाही, अशावेळी तुमच्या खात्यातून वळती झालेली रक्कम पुन्हा तुमच्या खात्यात जमा होईल. ही रक्कम लागलीच अथवा 48 तासात केव्हाही खात्यात जमा होईल.

यूपीआयकडून निधी हस्तांतरित करण्यासाठी लाभार्थीच्या नोंदणीची आवश्यकता नाही. लाभार्थ्याच्या खात्यात व्हर्च्युअल आयडी/ खाते आणि आयएफएससी/आयएफएससी/ आधार क्रमांकाच्या मदतीने पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. यूपीआय ऑपरेट करण्यासाठी आधी बँक अकाऊंट लिंक करावं लागायचं. पण आता तुम्ही पीपीआय वॉलेट आणि यूपीआयला लिंक करून यूपीआय पेमेंट अॅपही चालवू शकता.

देयकाची कमाल मर्यादा काय आहे

यूपीआयमधील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पेमेंट नाकारल्यास पैसे लगेच पैसे भरणाऱ्याच्या बँक खात्यात परत केले जातात. जर तुमच्या खात्यात लगेच पैसे परत येत नसतील तर ज्या बँकेशी यूपीआय लिंक आहे, तुम्ही त्या बँकेशी संपर्क साधू शकता . यूपीआयशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला त्याच बँकेशी संपर्क साधावा लागेल ज्या बँकेशी यूपीआय जोडला गेला आहे. जास्तीत जास्त व्यवहाराचा विचार केला तर प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये हस्तांतरण करण्याची सोय करण्यात आली आहे.

पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे.
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च.
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल.
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.