Smart Home Tips | वीज बिलानं खिशाला भुर्दंड; टिप्स वापरा, वीज बिल घटवा
बल्ब,पंखा,कूलर,एसी,मायक्रोवेव्ह,फ्रीज,हीटर आणि गिझर सारखी साधने असतात. तुम्हाला सूचवित असलेले उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ मिनिटभर वेळ लागेल. मात्र, त्यामुळे वीजेचा वापर निश्चितच घटेल.
नवी दिल्ली : निवडणुकीच्या आश्वासनात स्वस्त वीजेचे आश्वासन हमखास असतेच. ठराविक युनिट वापरापर्यंत वीजबिलात सूट देखील काही राज्यांत दिली जाते. मात्र, नेहमीच वापरापेक्षा अधिक वीज बिल आल्याची तक्रार केली जाते. महिन्याला वीज बिलात होणारा चढ-उतार आर्थिक बजेटवर परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे प्रत्येकजण कमी वीज बिलासाठी प्रयत्नशील असतो. तुम्ही सध्याच्या सुविधांचा वापर कमी करण्याऐवजी आम्ही तुम्हाला वीज बिलात कपात करण्याचे मार्ग सांगणार आहोत.
प्रत्येक घरात बल्ब,पंखा,कूलर,एसी,मायक्रोवेव्ह,फ्रीज,हीटर आणि गिझर सारखी साधने असतात. तुम्हाला सूचवित असलेले उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ मिनिटभर वेळ लागेल. मात्र, त्यामुळे वीजेचा वापर निश्चितच घटेल.
फ्रीज:
फ्रिजच्या तापमानात वाढ करुन तुम्ही वीजेचा वापर कमी करू शकतात. ताज्या अन्नपदार्थासाठी 36-38 डिग्री फॕरेनहाईट तापमान पुरेसे ठरते. सर्वसाधारणपणे फ्रिजद्वारे 5-6 डिग्री कमी तापमानालाच प्रक्रिया केली जाते. तसेच फ्रीजरला सेट करण्यासाठी 0 ते 5 डिग्री फॕरेनहाईट दरम्यानचे इनपुट आवश्यक ठरते
यासोबतच, फ्रिज आणि फ्रीजर नेहमीच सामानाने भरलेले असावे. याद्वारे तुम्ही आत ठेवलेल्या सामानाला थंड होण्यासाठी आवश्यकतेपेक्षा कमी उर्जेची आवश्यकता भासेल. त्यामुळे कमी उर्जेत अधिक काळ फ्रीज थंड ठेऊ शकतात. तसेच फ्रीज खरेदी करतेवेळीच एनर्जी सेव्हर कपॕसिटर असल्याची खात्री करा.
वॉशिंग मशीन:
तुमच्या वॉशिंग मशीनला नियमित स्वच्छ करा. जेणेकरुन कपडे धुतेवेळी ड्रायर अधिक वेगाने चालेल आणि कमी वेळात काम पूर्ण होईल. कपडे धुण्यासाठी दिवसाऐवजी रात्रीची वेळ निवडा. कपडे नेहमी थंड पाण्यात धुणे आधिक फायदेशीर ठरते. वॉशिंग मशीनचे तापमान सेट करण्याची आवश्यकता नसते आणि कपडे लवकर स्वच्छ होतात.
ड्रायरचा वापर नेहमी मोठ्या कपड्यांसाठी करा. काही कपडे ड्रायरचा वापर केल्याविना सुकविले जाऊ शकतात. तुमचा मशीनचा वापर कमी वेळेसाठी होईल आणि वीजेची बचत देखील प्रत्यक्षात येईल.
LED बल्बचा वापर करा:
घरामध्ये LED बल्बचा प्राधान्याने वापर करा. ज्यामुळे वीजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल. अन्य बल्बच्या तुलनेत एलईडीमुळे 80% वीजेचा वापर घटतो.तसेच घरातील इलेक्ट्रिक बोर्डात स्मार्ट पॉवर स्ट्रिपचा वापर करा. जेणेकरुन घरातून बाहेर पडताना प्रत्येक स्विच बंद करण्याची आवश्यकता भासणार नाही. एकाचवेळी घरातील सर्व वीज बंद होईल.
हेही वाचा :
‘या’ बँका देतात झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर अधिक व्याज, खाते उघडण्यापूर्वी यादी चेक करा
मतदान कार्ड, पासपोर्ट पेक्षाही आधार कार्ड महत्त्वाचे; तुम्हाला आधारचे हे उपयोग माहिती आहेत का?