अधिक चांगला परतावा पाहिजे?, तर नवीन वर्षात ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक
बचत खाते, बँकेत एफडी किंवा बँकेच्या अन्य एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवणे ही गुंतवणुकीची पारंपरिक साधणे झाली. मात्र सध्याच्या जमान्यामध्ये गुंतवणूकदारांना अनेक अधुनिक गुंतवणुकीची साधने उपलब्ध झाली आहेत. ज्यांच्या माध्यमातून थोड्याच दिवसांमध्ये मोठा परतावा मिळतो.
नवी दिल्ली : बचत खाते, बँकेत एफडी किंवा बँकेच्या अन्य एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवणे ही गुंतवणुकीची पारंपरिक साधणे झाली. मात्र सध्याच्या जमान्यामध्ये गुंतवणूकदारांना अनेक अधुनिक गुंतवणुकीची साधने उपलब्ध झाली आहेत. ज्यांच्या माध्यमातून थोड्याच दिवसांमध्ये मोठा परतावा मिळतो. मात्र त्यासोबतच गुंतवणुकीमध्ये काही प्रमाणात जोखीम देखील असते. सध्या गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंडला पंसती दर्शवत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये डिमॅट खात्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पुढील वर्षी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे कोणते पर्याय चांगला परतावा देऊ शकतील याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
आयपीओ
इनिशियल पब्लिक ऑफरिंग किंवा आयपीओच्या माध्यातून चालू वर्षामध्ये 63 कंपन्यांनी तब्बल 1.18 लाख कोटींचे भांडवल उभारले आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आयपीओच्या माध्यमातून 2020 च्या तुलनेमध्ये 2021 मध्ये उभारण्यात आलेली रक्कम ही 4.5 पटीने अधिक आहे. 2022 मध्ये हाच आकडा दहा पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थोडक्यात काय तर गुंतवणूकदार सध्या आयपीओ सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही देखील फायद्यात राहू शकतात. मात्र आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
म्यूच्युअल फंड
जर तुम्ही तुमच्या दीर्घ कालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी म्यूच्युअल फंड हा चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडीपेक्षा अधिक परतावा देखील मिळून शकतो. पाच किंवा सात वर्षांसाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, यामध्ये इतर कुठल्याही योजनेपेक्षा जोखीम अधिक असते.
शेअर बाजार
शेअर बाजारमधील गुंतवणूक देखील फायदेशीर राहू शकते. चालू वर्षात अनेक गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळाला आहे. पुढील वर्षी देखील शेअर मार्केटमध्ये तेजी राहण्याचे संकेत दिसून येत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास एफडी किंवा बँकेच्या इतर योजनांपेक्षा अधिक चांगला परतावा मिळू शकतो. सध्या गुंतवणूकदारांचा कल शेअर मार्केटकडे वाढलेला दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये डीमॅट खात्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या
2022 मध्ये निर्यातीला येणार अच्छे दिन; पुढील वर्षी 530 अब्ज डॉलरच्या उलाढालीची अपेक्षा
नववर्षात झारखंड सरकारचे नागरिकांना मोठे गिफ्ट, पेट्रोल होणार 25 रुपयांनी स्वस्त