AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्षाच्या स्वागताला काश्मीरला जायचंय?, चिंता सोडा पटापट बॅग भरा, आयआरसीटीसीकडून मिळतीये खास ऑफर

नवीन वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण बाहेरगावी जाण्याचा प्लॅन बनवत असतात. विशेष म्हणजे नव्या वर्षाची सुरुवातच विकेंडने होत आहे. त्यामुळे  तुम्हाला आणखी काही जादा सुट्या मिळू शकतात.

नववर्षाच्या स्वागताला काश्मीरला जायचंय?, चिंता सोडा पटापट बॅग भरा, आयआरसीटीसीकडून मिळतीये खास ऑफर
irctc
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 1:59 PM

नवी दिल्ली : नवीन वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण बाहेरगावी जाण्याचा प्लॅन बनवत असतात. विशेष म्हणजे नव्या वर्षाची सुरुवातच विकेंडने होत आहे. त्यामुळे  तुम्हाला आणखी काही जादा सुट्या मिळू शकतात. तुम्ही यावर्षी नव वर्षाच्या स्वागतासाठी काश्मीरला जाऊ शकता. काश्मीर हे सुरुवातीपासूनच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. काश्मीरमधील थंड हवेचे ठिकाणं, पडणारा बर्फ, सरोवरे हे सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. जर नव वर्षाच्या सुरुवातीलाच काश्मीरला जाण्याची संधी मिळाली तर सोनेपे सुहागा असतो. अशीच संधी पर्यटकांना आता आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांना काश्मीरसाठी आयआरसीटीसीकडून खास ऑफर देण्यात आली आहे. तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊन, अगदी स्वस्तात काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.  

रायपूरमधून होणार सुरुवात

काश्मीरच्या या टूरची सुरुवात छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरच्या विमानतळावरून होणार आहे. प्रवाशी रायपूरवरून विमानाने दिल्ली विमानतळावर उतरतील. त्यानंतर ते दिल्ली विमानतळावरून श्रीनगरला जाण्यासाठी कनेक्टिंग फ्लईटमध्ये बसतील. श्रीनगरला पोहोचल्यानंतर तिथे असलेल्या हॉटेलमध्ये पर्यटकांच्या रात्रीच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.  दुसऱ्या दिवशी सकाळीच पर्यटक पर्यटनासाठी पहलगामला रवाना होतील. रस्त्यात येणाऱ्या सर्व पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन या यात्रेमध्ये करण्यात आले आहे.

‘टूरला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद ‘

दरम्यान दुसऱ्या दिवसी सोनमार्गच्या पर्यटनाचे नियोजन आहे. या भागात पर्यटक जंगल, बर्फाच्छिद डोंगर आणि इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. दरम्यान संध्याकाळी पर्यटकांना पुन्हा श्रीनगरला आणण्यात येतील. तीसऱ्या दिवशी श्रीनगरमधील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. या पर्यटनादरम्यान प्रवाशांच्या राहण्या, खाण्याची सर्व व्यवस्था ही आयआरसीटीसीच्या वतीनेच करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीची ही टूर पर्यटकांच्या बजेटमध्ये असल्याने पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 400 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Income Tax Return Filing : आतापर्यंत 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल

भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक.