What is a miss | ‘मिस कॉल पे’ म्हणजे काय रे भाऊ; याचा वापर करायचा तरी कसा ? काय आहे विना इंटरनेट पैसे पाठविण्याची व्यवस्था?

तुमच्या हजार- दोन हजार रुपयांच्या साध्या फोनमधून ही आता व्यवहार करणे सहज शक्य आहे. कॉलिंग, एसएमएस नंतर वापरकर्त्याला विना इंटरनेट स्मार्टफोनसारखा व्यवहार करुन रक्कम हस्तांतरीत करता येणार आहे. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने UPI 123pay या सुविधेच्या माध्यमातून कॉल करा, पे करा ही सुविधा सुरु केली आहे.

What is a miss | 'मिस कॉल पे' म्हणजे काय रे भाऊ; याचा वापर करायचा तरी कसा ? काय आहे विना इंटरनेट पैसे पाठविण्याची व्यवस्था?
शुल्क लागणार का?Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 2:15 PM

UPI 123pay: रक्कम हस्तांतरण (Fund Transfer) करण्याची किंवा दुसऱ्याला पेमेंट करण्याची अनेक माध्यमं आहेत. आता स्मार्टफोनबरोबरच फीचर फोनद्वारेही तुम्ही रक्कम हस्तांतरित करु शकता. तुम्हाला ‘मिस कॉल पे’द्वारे (Miss Call Pay) पेमेंट करता येणार आहे. रक्कम हस्तांतरण करण्यासाठी तुम्हाला मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि व्यवहार होईल. खरं तर, ही संपूर्ण सुविधा यूपीआय (UPI) पेमेंटसाठी आहे,तेही फीचर फोनच्या मदतीने. त्यासाठी इंटरनेट सुविधा असलेले स्मार्ट फोनच (Smart Phone) असावेत याची गरज नाही. बटणांवर चालणा-या बेसिक फिचर फोनवरुन (Feature Phone) सुद्धा तुम्ही विना इंटरनेट पैसे पाठवू शकता. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) UPI 123pay या सुविधेचा शुभारंभ केला आहे. ‘कॉल करा, पे करा’ या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना रक्कम पाठविता येणार आहे. युपीआय 123 ही सुविधा पैसे हस्तांतरीत करण्यासाठी पुर्णतः सुरक्षित पद्धत आहे. यामध्ये दुस-या व्यक्तीला त्वरीत रक्कम त्याच्या खात्यात प्राप्त होणार आहे. सध्या ही सुविधा तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेटच्या सहाय्याने सुरु आहे. परंतू, ग्रामीण भागातही आर्थिक क्रांतीचे फळ पोहचवण्यासाठी सरकारने विना इंटरनेट असलेल्या फिचर फोनवहही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केवळ तीन पाय-यांचा वापर करत तुम्ही समोरील व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत करु शकता. या प्रक्रियेत सर्वात अगोदर कॉल करण्यात येतो आणि नंतर पर्याय निवडता येतो आणि सर्वात शेवटी रक्कम हस्तांतरीत करता येते.

मिस्ड कॉलमधून पेमेंट कसे करावे

मिस्ड कॉल्स आणि फीचर फोनवरून कॉल करण्यासोबतच अॅपवरून पेमेंटही केलं जातं. काही फीचर फोनमध्ये पेमेंट अॅप आधीच बनवलेलं असतं. हे अॅप इंटरनेटशिवाय चालतं. आपल्याला फक्त फीचर फोनच्या या अॅपवर नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर रक्कम जमा करण्याचे काम सुलभरित्या पूर्ण होते. याशिवाय आयव्हीआर आणि आयएसएसडीमधून ग्राहकांना पेमेंट करता येणार आहे. फीचर फोनच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या फीचर फोनवर तसेच स्मार्टफोनवर पैसे पाठवू शकता. यूपीआय 123 मधून दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. एकदा आपण फीचर फोनवर यूपीआयसाठी नोंदणी केली आणि यूपीआय पिन तयार केला की, इतर कोणत्याही डिव्हाइसवर पैसे पाठवले जाऊ शकतात.

असे पाठवा पैसे

मिस कॉल पेच्या मदतीने व्यापारी किंवा दुकानदाराला पेमेंट केले जाते. यामध्ये मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन पेमेंट केले जाते. मिस्ड कॉल दिल्यानंतर दुसऱ्या बाजूने फोन येतो आणि लाभार्थ्याचे नाव विचारले जाते. यानंतर फोनद्वारे रक्कम टाकावी लागते. शेवटी यूपीआय पिन टाकल्यानंतर पेमेंट केलं जातं. योग्य पिन टाकताच लगेच पेमेंट केलं जातं. यूपीआयच्या इतर कोणत्याही माध्यमातून व्यवहार केला जातो त्याप्रमाणेच ही रक्कम हस्तांतरित करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

रक्कम परत येईल खात्यात

ग्राहकाला 08045763666 वा 6366200200 अथवा 08045163581 या क्रमांकावर तुमच्या फिचर अर्थात साध्या फोनवरुन कॉल करावा लागेल. त्यानंतर हस्तांतरणाचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर युपीआय पिन टाकावा लागेल. त्यानंतर रक्कम अदा होईल. ही संपूर्ण प्रक्रिया चार टप्प्यात पूर्ण होईल. प्री-डिफांईड आयवीआर क्रमांक, मिस्ड कॉव पे, ओईएम इनेबल्ड पेमेंट आणि आवाजावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने युपीआय पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल. या प्रक्रियेत चुकीचा युपीआय पिन टाकल्यास तुमचा व्यवहार रद्द करण्यात येईल, तुमची रक्कम हस्तांतरीत करता येणार नाही. या प्रक्रियेत तुमची रक्कम खात्यातून वळती झाली तरी ती रक्कम लगेचच तुमच्या खात्यात जमा होईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.