सोने खरेदी करताना आजपासून मोठा बदल, आधार प्रमाणे होणार असणार कोड, जाणून घ्या सर्व नियम

सोने खरेदीसंदर्भात नियमात १ एप्रिलापासून बदल केला गेला आहे. हा बदल का केला गेला? हा प्रश्न सर्वांना आहे. सामान्य लोकांना सोन्याची शुद्धता समजत नाही. यामुळे खरे सोने समजून चुकीची खरेदी करू नये, यासाठीच हा बदल आहे. नेमके काय बदल होणार जाणून घ्या

सोने खरेदी करताना आजपासून मोठा बदल, आधार प्रमाणे होणार असणार कोड, जाणून घ्या सर्व नियम
सोन्याचे नवीन नियम काय
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 8:52 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी आणि विक्रीसंदर्भात नियम बदलले आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या आदेशानूसार १ एप्रिलपासून नवीन हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने आणि सोने विकता येणार नाही. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. सामान्य लोकांना सोन्याची शुद्धता समजत नाही. यामुळे खरे सोने समजून चुकीची खरेदी करू नये. यासाठी सोन्याचे हॉलमार्किंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

काय आहे फायदा

हॉलमार्क केलेले सोने ओळखणे सोपे होणार आहे. कारण ज्याप्रमाणे आधार कार्डमध्ये 12 अंकी कोड असतो, त्याचप्रमाणे सोन्याला 6 अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID म्हणतात. सोन्यावर 22K916 लिहिले आहे, याचा अर्थ ते 22 कॅरेट सोने आहे आणि ते 91.6% शुद्ध आहे.

हे सुद्धा वाचा

चारवरुन सहा आकडी कोड

16 जून 2021 पर्यंत सोन्याचे हॉलमार्किंग आवश्यक नव्हते. हे सोने खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या इच्छेवर अवलंबून होते. तेव्हा HUID क्रमांक 4 अंकांचा होता. यानंतर 1 जुलै 2021 पासून हॉलमार्क क्रमांक 6 अंकी करण्यात आला. आता 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्किंगबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हॉलमार्क फक्त दानिन्यांवरच का

सोने, सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि नाण्यांसाठी हॉलमार्क असणार आहे. परंतु ज्वेलर्स ग्राहकांकडून हॉलमार्क नसलेले जुने सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि नाणी खरेदी करु शकतात. ग्राहकांकडे असलेले जुने सोने किंवा जुने हॉलमार्क केलेले दागिने वैध राहतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच ग्राहक त्यांचे जुने दागिने ज्वेलर्सना विकू शकतात.

काय आहे फायदा

नवीन हॉलमार्क नियमामुळे सर्वसामान्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यांना फायदाच आहे. तुम्ही हॉलमार्कसह जुने सोने विकायला गेलात, तर ज्वेलर्स ते कोणत्याही वजावट न करता त्या वेळच्या किमतीत खरेदी करतील.

चांदीसाठी हॉलमार्क आहे का

हॉलमार्कचा नवा नियम सध्या फक्त सोन्यासाठी आहे, तो चांदीसाठी नाही.

मेकींग चार्ज वाढणार का

नवीन नियम लागू झाल्यानंतर मेकिंग चार्जवर काहीच परिणाम होणार नाही. पूर्वीप्रमाणेच मेकिंग चार्ज लागणार आहे, त्यात काही वाढ होणार नाही.

नियम तोडणाऱ्यास शिक्षा काय

हॉलमार्कचा नवीन नियम तोडणाऱ्या ज्वेलर्सना दागिन्यांच्या किमतीच्या पाचपट दंड भरावा लागणार आहे. याशिवाय एक वर्ष तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

सोने अन् पॅन कार्डच्या नियमात १ एप्रिलपासून बदल, ही कामे करुनच घ्या…सविस्तर वाचा

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.