मुंबई : हिमांशूमुंबईत राहतो. तो एक व्यावसायिक आहे. त्याच्याकडे दररोज मोठ्या प्रमाणात रोकड येत असते. दैनंदिन कामाची गरज भासल्यानंतरही त्याच्याकडे भरपूर रोख रक्कम शिल्लक राहते. हिमांशू ही रोकड चालू आणि बचत खात्यात (saving account) टाकतो. अनेकदा हा पैसा दोन ते तीन महिने तसाच पडून राहतो. पण बिझनेसमन (businessman)असूनही हिमांशूला या पैशातून कमाई काही करता येत नाही. म्हणजे हा पैसा दोन ते तीन महिने खात्यात नुसता पडून असतो. यामुळेच हिमांशूला चुटपुट लागली आहे. मग अशा परिस्थितीत हिमांशूने काय करावे? अल्पमुदतीसाठी पैसे गुंतवून काही नफा कमावता येईल असा काही पर्याय आहे का ? त्याचबरोबर गरजेच्या वेळी हा पैसा व्यवसायातही (business) वापरता आला पाहिजे. हिमांशू आणि अशा अनेकांसाठी एक पर्याय आहे.
आता हिमांशूच्या मनात प्रश्न येत आहे की, हे मनी मार्केट म्युच्युअल फंड कोणते आहेत? खरे तर हे फंड मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये पैसे टाकतात. म्हणजेच मनी मार्केट फंड डेट प्रकारात मोडतात. या योजना अशा सेक्टर मध्ये गुंतवणूक करतात ज्यांची जास्तीत जास्त मॅच्युरिटी 1 वर्षाची असते. हे फंड ट्रेझरी बिल्स, डिपॉझिटची प्रमाणपत्रे, कमर्शियल पेपर्स, पुनर्खरेदी करार यामध्ये पैसे गुंतवतात.
तर भाऊ या फंडात किमान आठवडाभरासाठीही गुंतवणूक करता येते. पण, जोखीम किती? हे फंड तुमच्या गुंतवणुकीची संपूर्ण हमी घेत नाहीत, परंतु ते बहुधा जोखीम-मुक्त सेक्टर मध्ये गुंतवणूक करतात
एक्झिट लोड शून्य आहे, म्हणजे फंडातून बाहेर पडताना मोठी रक्कम हाती राहते. जीसीएल सिक्युरिटीज लिमिटेडचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांच्या मते, अल्पकालीन गुंतवणुकीसाठी हे फंड उत्तम आहेत. 2-3 महिने पैसे पडून राहत असतील तर ते बँकेत ठेवण्याऐवजी तुम्ही ते मनी मार्केट फंडात टाकू शकता.
एसआयपी’च्या माध्यमातून डेट फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडी किंवा आरडीसारखा परतावा सोप्या पद्धतीने मिळेल. होय, यात एक प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला बँक एफडीपेक्षा कमी टॅक्स भरावा लागतो. जीसीएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांच्या मते, ज्या लोकांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये बाजारातील जोखीमेचा समावेश करायचा नाही त्यांच्यासाठी डेट हा एक चांगला पर्याय आहे. गुंतवणूकदारांनी एसआयपी च्या माध्यमातून डेट फंडात गुंतवणूक करावी. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी डायनॅमिक बाँड फंड, गिल्ट फंड, कॉर्पोरेट बाँड फंड आदी बाबी एसआयपीच्या माध्यमातून उत्तम पर्याय ठरू शकतात.
इतर बातम्या
Tata Motors cars: मार्चमध्ये टाटाच्या 42000 गाड्यांची विक्री, जाणून घ्या देशातल्या टॉप 5 कार
Pune | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ; पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांबाबत वापर होणार बंद ; कारण काय?
Pandharpur : गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गर्दी