आरोग्य विमा काढताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बाबी

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे लॉकडाऊनमुळे ढासळलेली आर्थिक परिस्थिती, या दोन कारणांमुळे चालू वर्षांत अनेक चढ -उतार पहायला मिळाले. कोरोना तसेच अन्य आजारांच्या धास्तीने गेल्या दोन वर्षांमध्ये आरोग्य विमा काढणाऱ्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे.

आरोग्य विमा काढताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बाबी
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे लॉकडाऊनमुळे ढासळलेली आर्थिक परिस्थिती, या दोन कारणांमुळे चालू वर्षांत अनेक चढ -उतार पहायला मिळाले. कोरोना तसेच अन्य आजारांच्या धास्तीने गेल्या दोन वर्षांमध्ये आरोग्य विमा काढणाऱ्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. मात्र आरोग्य विमा काढताना विशेष काळजी घ्यावी लागते. एक छोटीशी चूक देखील आपल्याला चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळे तेव्हा पश्चताप करण्यापेक्षा आधीच काळजी घेणे कधीपण चांगले. मग विमा काढताना नेमकी काय काळजी घ्यावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

आजार कव्हर होतो का?

तुम्ही जेव्हा एखादा आरोग्य विमा काढता तेव्हा सर्व प्रथम हा विचार करायला पाहिजे की तुम्हाला असेलेला आजार या विम्यामध्ये कव्हर होतो की नाही, किंवा तुम्हाला जर एखाद्या आजाराची भीती वाटत असेल आणि तुम्ही जर त्या संभाव्य आजारासाठी विमा काढणार असाल तर तो त्यामध्ये कव्हर होतो की नाही हे आवश्य पहावे. कव्हर न झाल्यास तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.

क्लेमची रक्कम किती मिळणार

ही एक आणखी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा विमा काढता तेव्हा तुम्हाला त्याचा किती क्लेम मिळणार आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणजे विम्यामधून मिळणाऱ्या रकमेतून तुम्हाला तुमच्या आजारपणावर झालेला सर्व खर्च भागवता येईल का विचार करावा. शक्यतो खर्च पूर्णपणे कव्हर होणाऱ्या आरोग्य विम्यालाच प्राधान्य द्यावे. विम्यामधून मिळणाऱ्या पैशातून जर तुमचा सर्व खर्च भागल्यास तुमच्यावर आर्थिक ताण येत नाही.

पॉलिसी नेटवर्क

तुम्ही ज्या कंपनीचा विमा घेणार आहात, त्या कंपनीचे देशातील विविध रुग्णालयांशी टायप असते. संबंधित कंपनीचे ज्या रुग्णालयांशी टायप आहे, त्याच रुग्णालयात तो विमा ग्राह्य धरल्या जातो. त्यामुळे तुम्ही ज्या कंपनीचा विमा घेणार आहात, त्या कंपनीच्या लीस्टमध्ये तुमच्या जवळपास असणारे किती रुग्णालये आहेत? हे काळजीपूर्वक पहावे. म्हणजे तुम्हाला उपचारासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही.

संबंधित बातम्या

नववर्षाच्या स्वागताला काश्मीरला जायचंय?, चिंता सोडा पटापट बॅग भरा, आयआरसीटीसीकडून मिळतीये खास ऑफर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 400 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.