शेअरबाजारासाठी आजचा दिवस कसा राहणार? कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
शेअर बाजारासाठी (Stock market) मंगळवार दिलासादायक ठरला. मंगळवारी शेअर मार्केटमध्ये निर्माण झालेल्या तेजीमुळे शेअरमार्केट ग्रीन झोनमध्ये (green zone) बंद झाले. मात्र तरी देखील शेअर मार्केट पूर्णपणे सावरले नसून, आज सुद्धा शेअर मार्केटवर युद्धाच्या पार्श्वभूमीवर दबाव राहण्याची शक्यता आहे.
मुंबई : शेअर बाजारासाठी (Stock market) मंगळवार दिलासादायक ठरला. मंगळवारी शेअर मार्केटमध्ये निर्माण झालेल्या तेजीमुळे शेअरमार्केट ग्रीन झोनमध्ये (green zone) बंद झाले. मात्र तरी देखील शेअर मार्केट पूर्णपणे सावरले नसून, आज सुद्धा शेअर मार्केटवर युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह (America) जगातील महत्त्वाच्या देशांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम पहायला मिळून शकतो. तज्ज्ञांच्या मतानुसार बुधवारी देखील शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील बड्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आज मोठी उलाढाल पहायला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअरमार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. मंगळवारी या घसरणीला ब्रेक लागला. मात्र या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोट्यावधीचा फटका बसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत संभ्रम आहे. जर तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वापूर्ण ठरू शकते.
अमेरिकेकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध
मंगळवारी रात्री रशियामधून आयात होणारे कच्च्य तेल, गॅस आणि इतर ऊर्जेच्या सामुग्रीवर निर्बंध घालण्यात आल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली. या निर्यणाचा फटका हा अशियाई शेअर बाजारावर देखील होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियामधून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध घालत असल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. ही घोषणा करताना त्यांनी म्हटले की, या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसू शकते. इंधनाचे भाव वाढू शकतात. मात्र आम्ही युक्रेनच्या बाजूने उभे आहोत. त्यांना रशियाच्या तावडीतून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, या पार्श्वभूमीवर रशियाचे आर्थिककोंडी महत्त्वाची आहे. मात्र दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देखील म्हटले आहे की, जर रशियावर आणखी आर्थिक निर्बंध घातल्यास कच्चे तेल 300 डॉलर प्रति बॅरलपर्यंत देखील पोहोचू शकते. ज्याची मोठी किंमत ही जगाला चुकवावी लागेल. कच्च्या तेलाची किंमत 130 डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहोचल्याने भारतीय इंधन कंपन्यांना आधीच मोठा फटका बसत आहे. त्यातच उद्या म्हणजे गुरुवारी देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेअरबाजारामध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरबदलाची शक्यता
येत्या काही दिवसांमध्ये देशातील प्रमुख कंपन्यांची बैठक आहे. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा प्रभाव हा शेअर मार्केटवर पडण्याची शक्यता आहे. जागतिक तसेच देशांर्गत घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अल्ट्राटेक सीमेंट, शॉपर्स स्टॉप, , यूपीएल, सफायर्स फूड्स, क्रॉप्टन ग्रीव्स, जिंदल स्टेनलेस, एसएमसी ग्लोबल, वोल्टास, फोर्टिस हेल्थकेअर या कंपन्याच्या शेअरमध्ये मोठा फेरबदल होऊ शकतो असे मत शेअर मार्केटमधील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेज सध्याची परिस्थिती पहात गुंतवणूकदारांनी शेअरमध्ये मोठी गुंतवणूक करू नये, असा सल्ला देखील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
संबंधित बातम्या
Fuel : कच्च्या तेलाचा आगडोंब, भाव 130 डॉलरच्या उंबरठ्यावर! पेट्रोल सव्वाशेपार जाणार?
SHARE MARKET TODAY: 4 दिवसांच्या घसरणीला ब्रेक! सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ