Data : WhatsApp वरील तुमचा डेटा झाला हॅक? हॅकर्सने पाडले भगदाड, जगभरातील 50 कोटी युझर्सची माहिती चोरीला..
Data : WhatsApp वरील तुमचा डेटा सुरक्षित आहे का?
नवी दिल्ली : Smartphone मुळे सर्वच जण आता सोशल मीडियाचा वापर करतात. त्यात सोशल मॅसेजिंग अॅप WhatsApp चा सर्वाधिक वापर होतो. पण आज WhatsApp च्या कोट्यवधी युझर्सच्या डोक्याला ताप देणारी बातमी समोर आली आहे. WhatsApp चा डाटा चोरीला गेल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात जगभरातील अनेक देशांतील वापरकर्त्यांची माहिती धोक्यात आली आहे.
WhatsApp चा डाटा चोरीला गेला आहे. अमेरिकेसहीत 84 देशातील वापरकर्त्यांची माहिती हॅक करण्यात हॅकर्सला यश आले आहे. त्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांच्या गोपनीय आणि इतर माहितीला धोका उत्पन्न झाला आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, व्हॅट्सअॅप हॅक झाले आहे. त्यामुळे जगभरातील 50 कोटी डाटा चोरीला गेला आहे. तुमचा डाटा हॅकर्स इतर कंपन्याना विक्री करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
व्हाट्सअपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी हॅकिंग मानण्यात येत आहे. हॅकर्सने युझर्सचे मोबाईल क्रमांक आणि इतर माहितीवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे हॅकर्सने हा डाटा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विक्रीला उपलब्ध केला आहे.
WhatsApp वरील हा हल्ला सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका मानण्यात येत आहे. व्हॉट्सअपच्या सुरक्षेलाच हॅकर्सने भगदाड पाडलं आहे. हा चोरी सहज घेण्यासारखी गोष्ट नाही. त्याआधारे हॅकर्स लोकांच्या व्यवहाराला आणि बँकेतील खात्यालाही धोका पोहचवू शकतात.
WhatsApp चा जगभरातील जवळपास सर्वच देशात वापर करण्यात येतो. सध्याच्या अहवालानुसार, जगभरातील 84 देशातील युझर्सचा डाटा चोरीला गेला आहे. या देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, इजिप्त, इटली, सऊदी अरब आणि भारताचा प्रामुख्याने समावेश आहे.
माहितीनुसार, अमेरिकेतील 32 दशलक्ष, इजिप्तच्या 45 दशलक्ष, इटलीच्या 35 दशलक्ष, सऊदी अरबेच्या 29 दशलक्ष, फ्रांसचे 20 दशलक्ष, तुर्कीचे 20 दशलक्ष, रशियाचे 10 तर इंग्लंडच्या 11 दशलक्ष वापरकर्त्यांचा डाटा चोरण्यात आला आहे.
Cybernews च्या दाव्यानुसार, हा डेटा हॅकर्सने हॅकिंग कम्युनिटीवर विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचा मोठा फटका दैनंदिन व्यवहार आणि बँक खात्याला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.