गव्हाच्या पिठासह दाळी, तांदूळ, तेल, मीठाने जीभेची चव घालवली: 10 वर्षांत किंमती कितीने वाढल्या, तुम्हाला माहिती आहेत का?

देशात पिठाचे दर विक्रमी पातळीवर आहेत. देशात एक किलो पिठाची सरासरी किंमत 33 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. पिठाशिवाय दाळी, तांदूळ, तेल, मीठ यांचेही भाव झपाट्याने वाढले आ

गव्हाच्या पिठासह दाळी, तांदूळ, तेल, मीठाने जीभेची चव घालवली: 10 वर्षांत किंमती कितीने वाढल्या, तुम्हाला माहिती आहेत का?
10 वर्षांत किंमती कितीने वाढल्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 2:17 PM

देशात गव्हाच्या पिठासह (Wheat Flour) दाळी, तांदूळ, तेल, मीठाचा( rice, oil, Salt) तोरा वाढला आहे. हे पदार्थ हळूहळू चैनीच्या वस्तूंच्या यादीत सरकतात की काय एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यात वाढ झाली आहे. गरिबांना सरकारकडून धान्याचा पुरवठा होत असला तरी इतर वस्तुंच्या किंमतीत वाढीने त्यांना ही फटका बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याचे (Price Hike) एक उदाहरण पाहुयात. एक व्यक्ती दिवसातून एकावेळी किमान 4 भाकरी खातो. या चार भाकरीसाठी त्याला किती किंमत मोजावी लागते? चला तर या 4 भाकरीची किंमत काढण्याचा प्रयत्न करुयात. 4 भाकरी तयार करण्यासाठी सरासरी 100 ग्रॅम पीठ लागते. दहा वर्षांपूर्वी एक किलो पीठ 22.48 रुपयांना येत असे. या हिशोबानुसार 4 भाकरी तयार करण्यासाठी 2.24 रुपये लागले. त्याचबरोबर आज एक किलो आटा 32.91 रुपये इतका येत आहे. तर 4 रोटी तयार करण्यासाठी 3.29 रुपये खर्च येतो. म्हणजेच 10 वर्षात 4 भाकरीच्या दरात एक रुपयाने वाढ झाली.

सध्या गव्हाच्या पिठाने चाकरमान्यांना महागाईच्या जात्यात भरडले आहे. पिठाच्या किंमती उच्चांकी पातळीवर आहेत. जानेवारी 2010 नंतर पिठाची किंमत विक्रमी उच्चांकावर आहे. ग्राहक मंत्रालयानुसार, देशात 9 मे रोजी एक किलो पिठाची सरासरी किंमत 32.91 रुपये होती. केवळ वर्षभरातच एक किलो पिठाच्या दरात चार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

का उडाला महागाईचा भडका

यामागे तज्ज्ञ दोन प्रमुख कारणे सांगतात. तज्ज्ञांच्या मते, देशात गव्हाचे उत्पादन घटत असून साठाही कमी होत आहे. याशिवाय देशाबाहेरही गव्हाची मागणी वाढत आहे.

5 महिन्यांत 6% वाढ सरकारी आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानीत 9 मे रोजी एक किलो पिठाची किंमत 27 रुपये होती. त्याचबरोबर अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये हे पीठ विक्रमी 59 रुपये किलोने विकले जात आहे. मुंबईत एक किलो पीठ 49 रुपयांना मिळत आहे. आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच पिठाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. 1 जानेवारीपासून पिठाच्या दरात 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या उत्पादनात आणखी घट आली आहे. रशिया आणि युक्रेनची जगातील गव्हाची निर्यात हिस्सा एक चतुर्थांश होता. 2019 मध्ये रशियाने 8.14 अब्ज डॉलर्स आणि युक्रेनने 3.11 अब्ज डॉलर्सच्या गव्हाची निर्यात केली होती. या दोन देशांमधील युद्धामुळे जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला असून भाव वाढत आहेत. भारतात गव्हाचे भाव वाढण्याचे एक कारण म्हणजे बाहेर भारतीय गव्हाला खूप मागणी आहे, त्यामुळे देशातील भाव वाढू लागले आहेत. याशिवाय डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे गव्हाच्या वाहतूकीचा खर्चही वाढला आहे.

फक्त पीठच नाही तर भात-डाळ, तेल, मीठही महागलं आहे.

केवळ गव्हाचे पीठच नव्हे, तर तांदूळ-डाळी, तेल, मीठ यांचे भावही लक्षणीय वाढले आहेत. 10 वर्षात एक किलो तांदळाच्या दरात 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 9 मे 2013 रोजी एक किलो तांदळाचा सरासरी भाव 25.40 रुपये होता, तो 9 मे 2022 रोजी वाढून 36.07 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे तूरडाळीच्या दरातही 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 वर्षांत एक किलो तूरडाळीचा भाव 70 रुपयांवरून 102 रुपयांवर गेला आहे.

याशिवाय तेलाचे भावही वाढले आहेत.भुईमुगाचे तेल 10 वर्षात 43 टक्क्यांनी महागले आहे. मोहरीच्या तेलाचा भाव 84 टक्क्यांनी वाढला आहे. बहुतेक सर्व अधिक तर पामतेल अधिक महाग झाले आहे. पामतेलाच्या किंमतीत 10 वर्षात 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, वनस्पती तेल 10 वर्षात तो 129 टक्के महाग झाले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.