Smart Watch : Wrist Watch वादाच्या फेऱ्यात, पण बराक ओबामा मात्र हा ब्रँड काही सोडेना..कारण तरी समजून घ्या..
Smart Watch : बराक ओबामा आता ही का वापरत आहेत ही स्मार्ट वॉच..
नवी दिल्ली : जर एखाद्याला विचारलं की अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) कोणत्या ब्रँडची स्मार्टवॉट वापरतात. तर तुमचे पहिले उत्तर असेल Apple Watch. परंतु हे काही अचूक उत्तर नाही. ओबामा अॅपलची स्मार्ट वॉच वापरत नाहीत.
तर ओबामा यांच्या हातात अनेकदा Fitbit या कंपनीची आयॉनिक स्मार्टवॉच (Iconik Smart Watch) दिसून आली आहे. 8 नोव्हेंबर रोजीच्या मध्यावधी निवडणुकीच्या प्रचार सभेतही त्यांच्या हातात हेच मनगटी घड्याळ दिसून आले.
आता यामागे काही अचंबित करणारे दावे करण्यात येत आहेत. त्यातील सर्वात मोठा दावा म्हणजे दस्तूरखुद्द ओबामाच Fitbit कंपनीचे मालक आहेत. ही स्मार्ट वॉच कलर LCD टचस्क्रीन सह येते. यामध्ये तीन हार्डवेअर बटण आणि इंटरचेंजेबल बँड्स आहेत.
Fitbit कंपनीने सतत होणाऱ्या तक्रारीनंतर Iconik स्मार्टवॉच या वर्षी मार्च महिन्यात परत बोलाविल्या होत्या. बॅटरी ओवरहिटिंग आणि हात जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कंपनीने हा पाऊल उचलले होते.
अमेरिकेतील ग्राहक उत्पादक सुरक्षा आयोगाच्या आकडेवारीनुसार, या मनगटी घडाळ्यामुळे एकट्या अमेरिकेत 115 तर जगभरात 59 जळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या स्मार्ट वॉचमुळे जवळपास 118 लोकांना गंभीर दुखापत झाली आहे.
Fitbit कंपनीने एकट्या अमेरिकेत 10 लाख स्मार्ट वॉचची विक्री केली आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर या कंपनीच्या 6,93,00 स्मार्टवॉचची विक्री झाली आहे. ग्राहकाची सुरक्षितता सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचा दावा Fitbit कंपनीने केला आहे.
फिटबिटच्या Iconik Smart Watch ची किंमत 21,199 रुपये आहे. हे घड्याळ वॉटरप्रुफ, फिटनेस ट्रॅकिंग अशा विविध फीचर्ससह येते. या घड्याळाचा डिस्प्ले साईज 1.4 इंच आहे. चार्जिंगनंतर 4 दिवस बॅटरी लाईफ आहे.
या घड्याळाचे रेझ्युलेशन 348 X 250 पिक्सल आहे. Fitbit स्मार्टवॉच एंड्रॉईड v4.4, iOS ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करते. ही स्मार्टवॉच ब्लू ग्रे, स्लेट ब्लू आणि चारकोल कलरमध्ये उपलब्ध आहे.