जोखीम न घेता कमाई हवीये; तर म्युच्युअल फंडात उभारा गुंतवणुकीची गुढी

डेट फंड हा सध्याच्या काळात चांगल्या कमाईसोबत कमी जोखमीचा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यामुळे तुमचा पोर्टफोलियो मजबूत आणि धोक्याच्या बाहेर असेल.

जोखीम न घेता कमाई हवीये; तर म्युच्युअल फंडात उभारा गुंतवणुकीची गुढी
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 10:33 AM

कमाई करताना धोका नको अशी मानसिकता परंपरागत गुंतवणुकदारांची असते. ते अनेकदा कमी व्याजदराचे नेहमीचे पर्याय निवडतात. तर ज्यांना अधिक कमाई करायची आहे आणि ते जोखीम (Risk) घ्यायला तयार आहेत, त्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते व्यवस्थित अभ्यास करून त्यात रक्कम गुंतवतात. मग अशावेळी प्रश्न उरतो की कमाई ही चांगली व्हावी पण जोखीम कमी असावी असा काही पर्याय नाही का? तर प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. त्यासाठी आर्थिक शिस्त मात्र अंगी भिनवावी लागेल आणि हो थोडाबहुत अभ्यास करावा लागेल. आंधळेपणाने हा रस्ता तुडविता येणार नाही. म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हटलं की परंपरागत गुंतवणुकदार नाक मुरडतात अथवा त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. कारण म्युच्युअल फंड सही है म्हणताना त्यात रिक्स कॅलक्युलेटेड (Calculated Risk) असते. पण इश्क है तो रिस्क है. मध चाखायचा तर मोहळ हुलवावे लागेल की नाही. तर कमाईसाठी थोडी रिस्क बनती है भाई.

दादानू डेट फंड पण वाईट नसा

मुदत ठेव, आवर्ती मुदत ठेव, किसान विकास पत्र आणि इतर अनेक पर्यायात गुंतवणूक सुरक्षिततेची मानली जाते. त्यात एक ठराविक रक्कम खात्यातून वजा होते. त्यामुळे डोक्याला ताप नसतो. ठराविक वेळेत खात्यातून रक्कम ठराविक कालावधीसाठी बचत होते. त्यावर चक्रवाढ व्याज मिळते आणि एका ठराविक कालावधीनंतर एकरक्कमी फायदा होतो, असा परंपरागत गुंतवणुकदारांचा युक्तीवाद चालतो. चूक काहीच नाही. पण तुम्हाला अधिकचा परतावा हवा असेल आणि 8 टक्क्यांच्यावर परतावा हवा असेल तर ही वहीवाट सोडून तुम्हाला गुंतवणुकीचा वेगळा मार्ग धरावा लागतो. तुम्ही म्युच्युअल फंडांमध्येही पैसे गुंतवू शकतात. अधिकचा परतावा आणि रिस्क कमी असा पर्याय शोधत असाल तर तुम्ही डेट फंडात पैसे टाका, अनेक म्युच्युअल फंड हाऊसेसने डेट फंडात गुंतवणुकीसाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना (Systematic Investment Scheme-SIP) उपलब्ध केली आहे. त्याआधारे तुम्ही दर महिन्याच्या एका ठराविक तारखेला यामध्ये गुंतवणूक करु शकता.

एसआयपी गुंतवणुकीचा चांगला पर्याय

म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमधील एसआयपी गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रिय झाल्या आहेत. याचा फायदा शेअर बाजारातील चढ-उताराच्या काळात होतो कारण संपूर्ण खर्च सरासरी केला जातो आणि छोट्या युनिट्समध्ये गुंतवणूक केली जाते. बाजार वाढला की, गुंतवणूकदारांना भाववाढीचा फायदा मिळतो. बाजाराच्या अस्थिर काळात एसआयपी हा उत्तम पर्याय मानला जातो. आता प्रश्न असाही आहे की, हे चढ-उतार कमी असताना रुपयाच्या खर्च-सरासरीचे सूत्र कर्जासारख्या साधनांमध्ये लागू होईल का? इक्विटी बाजाराप्रमाणेच डेट बाजारालाही स्वत:चा असा चढ-उतार असतो. घसरते आणि वाढते व्याजदर यामुळे बाँडच्या किमती कमी अधिक होतात, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे परिणाम फारसे मोठे नाहीत.

जोखीम नाही परतावा ही चांगला

‘एसआयपी’च्या माध्यमातून डेट फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडी किंवा आरडीसारखा परतावा सोप्या पद्धतीने मिळेल. होय, यात एक प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला बँक एफडीपेक्षा कमी टॅक्स भरावा लागतो. जीसीएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांच्या मते, ज्या लोकांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये बाजारातील जोखीमेचा समावेश करायचा नाही त्यांच्यासाठी डेट हा एक चांगला पर्याय आहे. गुंतवणूकदारांनी एसआयपी च्या माध्यमातून डेट फंडात गुंतवणूक करावी. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी डायनॅमिक बाँड फंड, गिल्ट फंड, कॉर्पोरेट बाँड फंड आदी बाबी एसआयपीच्या माध्यमातून उत्तम पर्याय ठरू शकतात.

संबंधित बातम्या

Today’s gold, silver prices: सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे स्पष्टीकरण

Emergency in SriLanka: श्रीलंकेत नागरिक रस्त्यावर, आंदोलनाला हिंसक वळण; सरकारकडून आणीबाणीची घोषणा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.