आधी लोकं कोराच चहा पित होती, दूध टाकायची आयडीया कुठून आली? याचं उत्तर मिळालंय!
चहात दूध टाकण्याची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली परंतु याचे कनेक्शन स्वाद आणि चव यांच्याशी अजिबात नव्हते. हा ट्रेंड ब्रिटनमध्ये कधीपासून सुरू झाला आणि त्याचे पुढे नेमके काय झाले, जाणून घेऊया या बद्दल.
मुंबई : 80 च्या दशकातील अनेक चित्रपटांत तुम्ही पाहिले असेल की, टेबलवर ठेवलेल्या चहात वरून दूध टाकले जाते. कधी विचार केला आहे का असे का? साधारणपणे घरात तयार होणाऱ्या चहामध्ये चहाला उकळी आल्यानंतर त्यात दूध टाकले जाते, पण असे का केले जात होते. खरंतर चहात वरून दूध टाकण्याची सुरुवात ब्रिटनमधून झाली. मात्र असे करण्यामागे चहाची चव वाढवणे हा हेतू अजिबात नव्हता. चला तर मग जाणून घेवूया ब्रिटनमध्ये चहा बनवण्याची ही खास पद्धत सुरू तरी कधी झाली?
म्हणून झाली दूध टाकण्यास सुरुवात
ब्रिटनमध्ये या पद्धतीने चहा बनविण्याच्या ट्रेंडची सुरुवात साधारणः पणे 18 व्या शतकात सुरू झाली. त्याकाळात चहा हा भांड्यात उकळला जात असे. चहा पिण्यासाठी चिनी कपाचा वापर केला जात होता, मात्र या कपांमध्ये एक कमतरता होती. ती म्हणजे जेव्हा या कपांमध्ये कोणत्याही प्रकारचे गरम लिक्विड टाकल्यावर ते अधिक तापमान त्या कपांना सहन होत नसे आणि त्यामुळे हे कप फुटत असत ब्रिटनमध्ये या तुटणाऱ्या चिनी कपांबद्दल लोकांनी काही नवीन जुगाड शोधायला सुरुवात केली. या जुगाडामध्ये आधी कपात दूध टाकले जात होते आणि नंतर त्यात वरून चहा ओतला जायचा, असे केल्याने दुधात चहा वरून ओतला जात असल्यामुळे चहाचे तापमान कमी होवून पूर्वीसारखा कप अधिक तापमानामुळे फुटत नसे. या पद्धतीने या ट्रेंडची सुरुवात झाली.
महागडे पेय म्हणून चाहाची ओळख
त्याकाळात चहा एक महागडे पेय म्हणून ओळखले जात असे आणि त्याकाळात समाजातील एक मोठा हिस्सा गरिब परिस्थितीशी झगडत होता त्यामुळे चिनी कप तुटल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांच्यासाठी चहा बनवणे सोपे नव्हते. यासाठीच चहा तयार करण्याची ही नवीन पद्धत नावारूपास आली आणि सर्वदूर पोहोचून दुसऱ्या देशांमध्ये सुध्दा याची सुरुवात झाली.
चवीमध्ये देखील झाला बदल
विशेष गोष्ट ही आहे की, त्याकाळी बोन चायनाचे कप देखील उपलब्ध होते, मात्र ते इतके महाग होते की सर्वसामान्य लोकांना ते खरेदी करणे जवळपास अशक्य होते. यामुळेच दूध वेगळे मिसळण्याचा ट्रेंड सुरू झाला. एका रिपोर्टनुसार असे सुध्दा निदर्शनास आले की असे केल्याने चहाच्या चवीमध्ये देखील खूप सुधारणा झाली यासाठी ज्या देशांमध्ये सुध्दा चहाचे कप फुटण्याची समस्या नव्हती तिथे सुद्धा ही पद्धत नावारूपास येऊ लागली आणि हीच पद्धत पुढे सर्वत्र वापरण्यात येऊ लागली.
संबंधित बातम्या
ऑनलाईन फसवणुकीची दखल पोलीस घेत नाहीत? सायबर भामट्यांशी लढण्याचा ई-पर्याय
कर्ज मंजुरीला ‘सिबिल’चं विघ्न; जाणून घ्या- सिबिल स्कोअर सुधारणेच्या टिप्स