दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

| Updated on: Feb 23, 2022 | 11:00 AM

दहावी, बारावीच्या परीक्षेवरून अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षेवरून अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्याने पुन्हा परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार असून, न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.