नालासोपाऱ्याच्या समर्थ नगरमधील चार मजली इमारत झुकली अन्…
VIDEO | नालासोपारा पश्चिम समर्थ नगर मधील जे एन एम इमारतीच्या पिलरला पूर्णपणे तडे, पालिकेनं काय उचललं पाऊल?
मुंबई : मुंबईतील नालासोपारा पश्चिम समर्थ नगर मधील जे एन एम ही इमारत झुकली आहे. इमारतीच्या पिलरला पूर्णपणे तडे गेले असून ती कधीही कोसळू शकते अशा स्थितीत आहे. झुकलेली इमारत पडताना कोणताही दुसऱ्या इमारतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी बाजूच्या जलाराम कुंज इमारती मधील 35 कुटुंब ही स्थलांतर करण्यात आले आहेत. पालिका प्रशासन, NDRF टीम, पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. आज रात्रीतूनच ही इमारत पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नालासोपारा पूर्व येथे असणाऱ्या पूर्व हनुमान नगरमधील झुकलेली इमारत पालिका प्रशासनाने अतिधोकादायक म्हणून घोषित केली होती. या इमारती मधील 16 कुटुंबांना रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
Published on: Jul 26, 2023 03:05 PM
Latest Videos