2002 Gujarat riots : गुजरात दंगलीला राजकीय चष्म्यातून पाहिलं गेलं, कोर्टाच्या निर्णयानंतर आरोप पुसले–अमित शाह
नरेंद्र मोदींवर करण्यात आलेले सर्व आरोप पुसले गेल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली: ‘सुप्रीम कोर्टाकडून नरेंद्र मोदी यांना क्लिन चीट देण्यात आल्यानं सर्व आरोप पुसले गेले आहेत. ही दंगल सुनियोजित नव्हती तर स्वयंप्रेरीत होती असं कोर्टानं हा निकाल देताना म्हटले आहे. मात्र, या दंगलीला कायमच राजकीय चष्म्यातून पाहिलं गेलं. या प्रकरणात अनेक खोटे आरोप करण्यात आले, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. गुजरात दंगली (Gujarat riots) प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पुसले गेल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 25, 2022 11:37 AM
Latest Videos