MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 3 January 2022
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज | राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा
जोहान्सबर्ग कसोटीत भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी लोकेश राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी केएल राहुलने सांगितले की, विराट कोहलीने पाठीच्या दुखण्यामुळे या सामन्यातून माघार घेतली आहे. मात्र, केपटाऊनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत कोहली खेळण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीला जोहान्सबर्ग कसोटीतून वगळण्याचा अर्थ असा आहे की, तो यापुढे दक्षिण आफ्रिकेत त्याची 100 वी कसोटी खेळू शकणार नाही. कोहलीने आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. अशा स्थितीत तो जोहान्सबर्गमध्ये 99 वी कसोटी आणि नंतर केपटाऊनमध्ये 100 वी कसोटी खेळणार होता. पण, दुखापतीमुळे भारतीय चाहत्यांना त्याला शंभराव्या कसोटीत खेळताना पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विराट कोहली आता बंगळुरूमध्ये 100 वी कसोटी खेळू शकतो. जोहान्सबर्ग कसोटीत हनुमा विहारीने विराट कोहलीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे.