AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abdul Sattar यांचा Raosaheb Danve यांना धक्का, BJP चे 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत

| Updated on: Feb 01, 2022 | 7:21 PM

सोयगाव नगरपंचायतीतील भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सत्तार यांनी शिवसेनेत खेचून आणले. नगरपंचायतीच्या 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता भाजपकडील 6 पैकी चार नगरसेवक शिवसेनेने आपल्याकडे वळवले आहेत.

औरंगाबादः जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीत (Soygaon Nagar panchayat) शिवसेनेने भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि भाजपचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यात सत्तारांची सरशी झाली होती. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी दानवेंना आणखी एक जबर धक्का दिला आहे. सोयगाव नगरपंचायतीतील भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सत्तार यांनी शिवसेनेत खेचून आणले. नगरपंचायतीच्या 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता भाजपकडील 6 पैकी चार नगरसेवक शिवसेनेने आपल्याकडे वळवले आहेत.