रत्नागिरीत पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना वेगळा आयाम मिळणार आहे. कारण आता रत्नागिरी तालुक्यातील पाच पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 5 कोटीचा निधी मिळणार आहे.
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना वेगळा आयाम मिळणार आहे. कारण आता रत्नागिरी तालुक्यातील पाच पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 5 कोटीचा निधी मिळणार आहे. त्यातील एक कोटीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झालाय. यात भाट्ये समुद्रकिनारा (Sea) श्री श्रेत्र पावस, रत्नदुर्ग किल्ला आणि आरेवारे समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या निधीतून रत्नदुर्ग किल्यावर (Fort) शिवसृष्टी साकारली जाणार आहे. तर आरे वारे या समुद्रकिनाऱ्याचा ही कायापालट होणार आहे. यामुळे रत्नागिरीतील पर्यटन वाढीसाठीला नक्कीच चालना मिळणार आहे.
Published on: Mar 04, 2022 12:53 PM
Latest Videos