नशीबाची तगडी साथ… गावातील ‘या’ समस्येसाठी लढवली निवडणूक अन् 85 वर्षाच्या आजीचा दणदणीत विजय
असं म्हणतात नशीब जर जोरदार असेल तर सगळ्या गोष्टी या नशीबाच्या साथीने आपल्याला मिळतात. असाच काहीसा प्रकार रायगड-खालापूरमधील ग्रामपंचायतीत बघायला मिळाला. ८५ व्या वर्षी आजीबाई चिमणीबाई दाऊ खरात यांनी निवडणूक लढवली आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत या आजीचा दणदणीत विजयही झाला
रायगड, ६ नोव्हेंबर २०२३ | असं म्हणतात नशीब जर जोरदार असेल तर सगळ्या गोष्टी या नशीबाच्या साथीने आपल्याला मिळतात. असाच काहीसा प्रकार रायगड-खालापूरमधील ग्रामपंचायतीत बघायला मिळाला. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात नंदनपाडा असे एक गाव आहे. रायगडपासून साधारण ५३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. २०११ ला झालेल्या जनगणनेनुसार या गावात साधारण १५० ते २०० कुटुंब राहत असतील. या गावातील पाणी प्रश्नावर बऱ्याचदा चर्चा झाली मात्र हा प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. मात्र ८५ वर्षांच्या आजीने गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवले. ८५ व्या वर्षी आजीबाई चिमणीबाई दाऊ खरात यांनी निवडणूक लढवली आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत या ८५ वर्षांच्या आजीचा दणदणीत विजय झाल्याचे पाहायला मिळाले.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री

