असं काय घडलं की, अकोल्यात दोन गट आले आमने-सामने अन् झाली तुफान हाणामारी

असं काय घडलं की, अकोल्यात दोन गट आले आमने-सामने अन् झाली तुफान हाणामारी

| Updated on: May 14, 2023 | 9:26 AM

VIDEO | अकोल्यात दोन गटात दगडफेक, शेकडो लोक आमने-सामने अन् जमावाकडून जाळपोळ, नेमकं कारण काय?

अकोला : शनिवारी रात्री अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. तर शेकडो लोक आमने सामने आल्याने दोन गटात हाणामारी झाली आणि जाळपोळ देखील करण्यात आली. या घटनेनंतर अकोल्यातील वातावरण चांगलंच पेटलं. यावेळी अकोला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर अकोल्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यात एका सोशल मीडिया ग्रुपवर एक पोस्ट आली. त्यामुळे वाद झाला आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले या लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली यावेळी काही लोकांनी दिसेल त्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावली अन् जाळपोळ केली. तर 100 हून अधिक बाईकस्वारांनी अकोल्यात फेरफटका मारत दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. तर शहरातील या राड्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.

Published on: May 14, 2023 09:26 AM