बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका!
ते शुद्धीवर येत नाहीयेत, हे पाहून तत्काळ रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी सकाळची ही घटना असून आज या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.
परभणीः परभणीत दुर्दैवी घटना घडलीये. बॅडमिंटन (Badminton) खेळत असताना हृदयविकाराचा (Heart attack) तीव्र झटका आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना परभणीत घडलीये. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सचिन तापडिया (Sachin Tapdia) असे या व्यक्तीचे नाव असून ते परभणीतील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. सकाळच्या वेळी बॅडमिंटन कोर्टवर खेळल्यानंतर बसलेले असताना सचिन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते खुर्चीवरून खाली कोसळले. कोर्टवरील खेळाडूंना सुरुवातीला काही कळलंच नाही. काहींनी त्यांना हवा घालण्याचा प्रयत्न केला. ते शुद्धीवर येत नाहीयेत, हे पाहून तत्काळ रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी सकाळची ही घटना असून आज या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

